Home मुंबई स्वराज्य पोलीस मित्र,पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबई विभागात संविधान दिवस...

स्वराज्य पोलीस मित्र,पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबई विभागात संविधान दिवस उत्साहाने साजरा

62
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_062701.jpg

स्वराज्य पोलीस मित्र,पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबई विभागात संविधान दिवस उत्साहाने साजरा
मुंबई, सौ सविता तावरे स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय/संस्थापक अध्यक्ष श्री. दीपकजी कांबळे सर व मुख्य महासचिव श्री. कमलेश (देवा सर) शेवाळे सर निर्देशानुसार,
आज रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने पंचशील विचार मंच, बर्वे नगर, भट वाडी, घाटकोपर (प) येथे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री संदीप वाघमारे सर यांच्या पुढाकाराने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी, मुंबई विभाग प्रभारी मालतेशसर हेब्बारे, ईशान्य मुंबई जिल्हा सचिव आनंद वैराळ, ईशान्य मुंबई सहसचिव संगीता वाघमारे, ईशान्य मुंबई संघटक ज्योती शेळके, ईशान्य मुंबई सहसंघटक दिपाली तांबे, ईशान्य मुंबई सहसंपर्कप्रमुख माधुरी परब, विक्रोळी तालुका उपाध्यक्षा लता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे, स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या संचालिका तथा मुंबई अध्यक्ष सविताताई तावरे यांनी विक्रोळी पार्कसाईट व घाटकोपर कामराज नगर येथील अनुक्रमे अखिल पार्कसाईट सेवा संघ व ग्रुप डायनॅमिक वेलफेअर असोसिएशनने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबीरास भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई विभाग उपाध्यक्ष संजय रेवणकरसर, मुंबई विभाग संघटिका वैशालीताई कांबळे, ईशान्य मुंबई जिल्हा प्रवक्ते समीर नाईक आणि विक्रोळी तालुका उपाध्यक्ष लताताई कांबळे उपस्थित होत्या. अखिल पार्कसाईट सेवा संघ येथे उपस्थित असलेले शास्त्रज्ञ श्री रविंद्र चोपडे यांच्याशी मुंबई अध्यक्ष सौ सविता तावरे यांनी संवाद साधला. कामराज नगर येथे ग्रुप डायनॅमिक वेलफेअर असोसिएशन येथे नवयुवकांनी आयोजन व नियोजन केलेल्या रक्तदान शिबिराचे सर्वानीच कौतुक केले. रक्तदान करण्याचे शतक पार पाडलेले आपले मुंबई विभाग उपाध्यक्ष श्री संजय रेवणकरसर यांचा सत्कार ग्रुप डायनॅमिक वेलफेअर असोसिएशन वतीने करण्यात आला. याप्रसंगी केलेल्या भाषणात रेवणकरसरानी रक्तदानचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. ईशान्य मुंबई जिल्हा प्रवक्ते श्री समीर नाईक यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात भारतीय संविधान दिना बद्दल थोडक्यात माहिती सांगितली, रक्तदात्यांना स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आणि ग्रुप डायनॅमिक वेलफेअर असोसिएशनच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

Previous articleग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशन आयोजित रक्तदान शिबीर-२०२३
Next articleक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनी अभिवादन!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here