Home मुंबई ग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशन आयोजित रक्तदान शिबीर-२०२३

ग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशन आयोजित रक्तदान शिबीर-२०२३

63
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_062251.jpg

ग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशन आयोजित रक्तदान शिबीर-२०२३
सविता तावरे मुंबई स्पेशल न्यूज रीपोर्टर– दि. २६ नोव्हेंबरला मुंबईमधील ग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशनने पल्लवी ब्लड सेंटर, गोवंडी यांसह संयुक्तपणे कामराज नगर, घाटकोपर (पूर्व) येथे रक्तदान शिबीर आयोजित केला. या रक्तदान शिबिराची कार्यवाही सकाळी 9:00 वाजता सुरू झाली आणि सायंकाळी 5:00 वाजता संपली. एकूण 65 रक्तबॅग यशस्वीपणे जमावल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पात्रता मापदंडांची तपासणी करून रक्तदानाची सहमती दिली. ग्रुप डायनॅमिकच्या सभासदांनी क. जे. सोमय्या विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या मदतीने शिबीराच्या जवळच्या स्थळांवर पथनाट्ये सादर करून लोकांमध्ये जागरूकता वाढवली. लोकांनी रक्तदानाच्या प्रेरणा घेऊन रक्तदान करण्यास शिबीरास भेट दिली.प्रत्येक रक्तदात्याला भेट म्हणून प्रमाणपत्र तसेच बॅग देण्यात आली. या शिबीरास ध्येय क्लासेस, मनसेचे पदाधिकारी (प्रभाग क्रमांक-१३३), साई-श्रद्धा पदयात्री सेवा संस्था, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संघटना अशा अनेक संस्थांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या शिबीरास देवेंद्रजी रत्नम आणि पल्लवी ब्लड सेंटर यांच मोलाच सहकार्य लाभलं. शिबीरा अंतर्गत सर्व डॉक्टर्स आणि सहकार्यकांचे आभार मानून शिबीर समाप्त केला. ग्रुप डायनॅमिकचे संस्थापक अलंकार शेडगे, इवेंट हेड विक्रांत जगदाळे, प्रणय जाधव आणि सर्व सभासदांनी ह्या शिबीरात रक्तबॅग गोळा करण्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन मिळवला होता आणि अर्थातच ग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशनच्या सर्व सभासदांमुळे हे शिबीर उत्तमरित्या यशस्वीपणे पार पडले.

Previous articleनेवासा येथे इजतेमा सोहळा संपन्न
Next articleस्वराज्य पोलीस मित्र,पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबई विभागात संविधान दिवस उत्साहाने साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here