Home उतर महाराष्ट्र नेवासा येथे इजतेमा सोहळा संपन्न

नेवासा येथे इजतेमा सोहळा संपन्न

60
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_061821.jpg

नेवासा येथे इजतेमा सोहळा संपन्न
सोनंई ,समीर शेख भर पावसात दहा हजार पेक्षा जास्त मुस्लिमांनी लावली हजेरी नेवासा खूपटी रस्त्यावर चालू असलेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय इस्तेमा ची सांगता रविवारी रात्री झाली येथे उभारण्यात आलेल्या दोन्ही मंडपात इशाची नमाज च्या वेळेस दहा हजार मुस्लिम भाविक उपस्थित होते
शनिवारी सकाळी फजरच्या नमाज नंतर ईजतेमा सोहळा सुरू करण्यात आला मौलाना हुसेन पुणे, मौलाना मुस्ताक कोपरगाव, अब्दुल सलाम भाई अहमदनगर ,मोहसीन भाई ,मुजाहिद भाई अहमदनगर ,हाफिज जाफर सोनई, मौलाना शाहिद जलका, मौलाना गुलाम चांदा, मुफ्ती जमीर चांदा, मौलाना इमरान कुकाना, मौलाना आसिफ खरवंडी आदींनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. दोन दिवसात दहा हजार पेक्षा जास्त मुस्लिम बांधवांनी या सोहळ्यास हजेरी लावली. आयोजक तर्फे सर्वांसाठी चहा, नाश्ता, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी व्यवस्था करण्यात आल्या होत्या. स्वयंसेवक युवकांनी कार्यक्रम पूर्ण झाल्यावर स्वच्छता अभियान राबवले. दोन दिवस नेवासा खूपटी या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी युवक उभे असल्याने अडचण आली नाही. येथील कार्यक्रमांमध्ये धार्मिक महत्त्व सांगताना, बंधूभाव, व्यसनमुक्ती बाबत संबोधन करण्यात आल्याची माहिती वकिल संघाचे सचिव एडवोकेट जमीर शेख यांनी दिली

Previous articleभाजप नेते  सतीश घाटगे यांची शासनासह प्रशासनाकडे मागणी
Next articleग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशन आयोजित रक्तदान शिबीर-२०२३
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here