Home जालना भाजप नेते  सतीश घाटगे यांची शासनासह प्रशासनाकडे मागणी

भाजप नेते  सतीश घाटगे यांची शासनासह प्रशासनाकडे मागणी

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_061322.jpg

भाजप नेते  सतीश घाटगे यांची शासनासह प्रशासनाकडे मागणी
अंबड / घनसावंगी जालना दिलीप बोंडे: जालना जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. अंबड घनसावंगी व जालना तालुक्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल पाठवावा, अशी मागणी भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी
केली आहे.
घनसावंगी मतदारसंघातील कुंभार पिंपळगाव, तिर्थपुरी, अंतरवाली तर अंबड तालुक्यातील जामखेड, रोहिलागड, गोंदी, वडीगोद्री या महसुली मंडळात अतीवृष्टी झाल्याने शेतीपिके आडवे झाले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊसही आडवा झाला आहे. मुसळधार  पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अुपऱ्या पावसामुळे नापीकिला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना  या संकटात मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी सतीश घाटगे यांनी केली आहे

Previous articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे निवेदन
Next articleनेवासा येथे इजतेमा सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here