Home उतर महाराष्ट्र सट्टा जुगाराच्या लावून गोरगरीबांना नादी; दाऊद सटाणा तालुक्यात करतोय बरबादी!! मुळाणे भागातही...

सट्टा जुगाराच्या लावून गोरगरीबांना नादी; दाऊद सटाणा तालुक्यात करतोय बरबादी!! मुळाणे भागातही दाऊचे साम्राज्य

166
0

राजेंद्र पाटील राऊत

सट्टा जुगाराच्या लावून गोरगरीबांना नादी; दाऊद सटाणा तालुक्यात करतोय बरबादी!! मुळाणे भागातही दाऊचे साम्राज्य
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव -ज्या सटाणा तालुक्याला यशवंतनगरी म्हणूनही ओळखले जाते.देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सटाणा तालुक्यात मात्र सट्टा जुगाराच्या नादी लावून अनेक गोरगरीब सर्वसामान्य कुटूंबाची बरबादी होत असतानाही पोलिसांचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत चालल्याने हा गंभीर चिंतनाचा विषय झालेला आहे.
ज्या सटाणा तालुक्यात ब्रिटीश कालखंडात पडलेल्या दुष्काळावेळी यशवंतराव महाराज यांनी सरकारी खजिना मोकळा करुन देत सर्वसामान्य गोरगरीबांना मदती केल्यात त्याच सटाणा तालुक्यात नाशिक भागातला सट्टा माफीया दाऊद मात्र गोरगरीब सर्वसामान्य आदिवासी काबाडकष्ट करणाऱ्या मोलमजुरांना सट्टा जुगाराच्या नादी लावून रोजच लाखो रुपयांची कमाई करीत आहे.मात्र त्यामुळेच गोरगरीबांच्या संसाराची बरबादी होत चालल्याचे भयानक दृश्य आहे.या अशा गंभीर व अवैधरित्या चालणाऱ्या बेकायदेशीर दाऊदच्या मुळाणे व डांगसौंदाणे येथील जुगार अड्डयावर कठोर कारवाई सटाणा पोलिसांकडून होणे अपेक्षित असताना तसे मात्र होताना दिसत नाही त्यामुळेच या सट्टा माफीया दाऊदच्या तथाकथित पाळलेल्या गुंडाना पैश्यांचा माज असल्याने ते कुणालाच जुमानत नाहीत व सर्वत्र दबंगगिरी सुरु आहे.म्हणूनच आता राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने येत्या गुरुवारी २७ जानेवारी रोजी प्रत्यक्ष नाशिक येथे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील यांना भेटून याबाबतीत लेखी तक्रार दिली जाणार आहे.

Previous articleवाघाच्या हल्ल्यात बैल गमावलेल्या शेतकऱ्याना शिवसेनेने दिला मदतीचा हात शिवसेना प्रमुख मा,बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती चे औचित्य——
Next articleराज्य अंधारात गेलं तर काँग्रेस जबाबदार नाही, महाविकास सरकार असेल : उर्जा मंत्री यांची नाराजी उघड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here