• Home
  • *के बी एच के विद्यालय खालप येथे स्वातंत्र्य दिन साजरा।*

*के बी एच के विद्यालय खालप येथे स्वातंत्र्य दिन साजरा।*

*के बी एच के विद्यालय खालप येथे स्वातंत्र्य दिन साजरा।* खालप,( एन.पी.वाघ प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
शनिवार 15 ऑगस्ट 2020 रोजी खालप येथे स्वातंत्र्य दिन कोरोना रोगाच्या सावटाखाली सोशल डिस्टन्स पाळून साजरा करण्यात आला. विद्यालयाचे ध्वजारोहण प्रभारी मुख्याध्यापक श्री चव्हाण एड झेड यांनी केले. त्यानंतर विद्यालयात मार्च 2020 मध्ये एस एस सी परीक्षेत प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री बाजीराव सुर्यवंशी यांनी केला.प्रथम विद्यार्थ्यांस 1001 रु तर उर्वरित विद्यार्थ्यांस 501 रु प्रत्येकी असे बक्षीस दिले।त्यानंतर खालप ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच श्री नानाजी सुर्यवंशी यांनी केले.विद्यालयाची भौतिक, शैक्षणिक ,गुणात्मक प्रगती,तसेच 10वी परीक्षेचा निकाल 95%,विद्यालयाची विद्यार्थीनी 92%गुण मिळवून मेशी केंद्रात प्रथम आली.मराठी तसेच विज्ञान विषयात 97 गुण कु जयश्री सुर्यवंशी ने मिळविले.त्याबद्दल विषय शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.श्री बाजीराव सुर्यवंशी यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळेच्या प्रगतीचा आलेख अतिशय उंचावत नेला यामुळे खालप गावाच्या वतीने सरपंच श्री नानाजी सुर्यवंशी यांनी सुर्यवंशी सरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.याप्रसंगी खालप ग्रामपंचायतीचे सदस्य, व्यवस्थापन समिती चे सदस्य, सोसायटी चे संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment