Home नांदेड कबनुर येथे विज पडुन बैलाचा मृत्यु पिडीत शेतकर्‍यांना प्रशासनाने तात्काळ मदत द्या...

कबनुर येथे विज पडुन बैलाचा मृत्यु पिडीत शेतकर्‍यांना प्रशासनाने तात्काळ मदत द्या रयत क्रांती संघटनेची मागणी.

92
0

राजेंद्र पाटील राऊत

कबनुर येथे विज पडुन बैलाचा मृत्यु
पिडीत शेतकर्‍यांना प्रशासनाने तात्काळ मदत द्या रयत क्रांती संघटनेची मागणी.
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील मौजे कबनुर येथील शेतकरी प्रकाश केशव इंगळे यांच्या बैलावर शुक्रवारी राञीला विज पडुन दुर्देवी मृत्यु झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
निसर्ग शेतकऱ्यावर कोपला असुन त्यातून शेतकरी अद्याप सावरला नाही तर आता निसर्गाने जनावरावर सुद्धा आपली अवकृपा दाखवली,गेल्यावर्षी म्हशीच्या निधन व त्या दुःखातून सावरले नाही तोच कालच्या रात्री मौजे कबनुर गावातील शेतकरी प्रकाश केशव पिंगळे यांच्या बैलावर वीज पडून दुर्दैवी अंत झाला आणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन कर्ज घेवुन अवघड परीस्थितीतुन बैल घेतला होता.अगोदरच अतिवृष्टी व ढगफुटीने शेतात होत्याचं नव्हतं झालं आणि आता नैसर्गिक आपत्तींना विज पडुन मौजे कबनुर येथील प्रकाश केशव इंगळे यांच्यावर मोठे संकट ओढवले असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,सरपंच प्रतिनिधी रामदास वाघमारे,पंढरी कांबळे, उपसरपंच माधव टेभुर्णे यांनी केली.

Previous articleआगामी नगर परिषदेची निवडणूक प्रहार स्वबळावर लढणार – शंकर भाऊ वड्डेवार
Next articleदेगलूर-बिलोली विधानसभा पोट निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात तर ३४ नामांकन अर्ज केले दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here