Home गडचिरोली चिमूरच्या क्रांतीभूमीत शहिद विरांना वाहिली श्रध्दांजली!

चिमूरच्या क्रांतीभूमीत शहिद विरांना वाहिली श्रध्दांजली!

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0044.jpg

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                      चिमूर क्रांती भूमीतील अमर शहिदांना अभ्यंकर मैदान शहीद स्मारक तथा हुतात्मा स्मारक येथील शहीद बालाजी रायपूरकर तसेच लढ्यात शहीद झालेल्या सर्व शहिदांना माजी. मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार आणि माजी. आमदार तथा प्रदेशमहासचिव नामदेवराव उसेंडी यांनी क्रांतीविरांना वाहिली श्रध्दाजंली

9 ऑगस्ट 1942 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजाविरोधात ‘चले जाव‘ चा नारा दिला. या ना-याने प्रभावित होवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘झाड झडूले शस्त्र बनेंगे , भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बाॅंम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे’ अशाप्रकारचे क्रांतीगीत गावून क्रांतीला प्रेरणा देणारे गीत गायल्याने चिमुर, आष्टी, यावली, बेनोडा येथील स्वांतंत्र्य सेंनानींना प्रेरीत होवून चिमुर येथे 16 ऑगस्ट 1942 ला नागपंचमीच्या दिवशी तिरंगा फडकविण्यासाठी म्हणून आंदोलन केले. या आंदोलनामध्ये असंख्य स्वांतंत्र्य सेंनानी सहभागी झालेले होते. या आंदोलनावर इंग्रज पोलीसामार्फत गोळीबार केल्यामुळे 14 वर्षाचे बालाजी रायपूरकर हे तरुण शहिद झाले. व असंख्य स्वांतंत्र्य सेंनानीं जखमी झाले या शहिदांची आठवण म्हणुन तत्कालीन चिमुरचे आमदार आदरणीय मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी चिमुर येथील किल्यावर शहीद स्मारकाची उभारणी केलेली आहे. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा, स्वांतंत्र्य सेंनानीं बालाजी रायपूरकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांची सुध्दा स्मारक उभारलेले आहे. दरवर्षी 16 ऑगस्ट ला शहिदांना अभिवादन करण्यात येत असते. यावर्षी सुध्दा 16 ऑगस्ट ला माजी मंत्री आदरणीय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेव उसेंडी, प्रदेश ओबीसी सेल संघटक धनराज मुंगले, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, माजी जि.प. सदस्य गजानन बुटके, माजी संचालक सि.डी.सी.बॅंक संजयभाउ डोंगरे, सरचिटणीस ओबीस सेल राजू लोणारे,ज्येष्ठ नेते भीमरावजी ठवरे, माजी सभापती किशोर शिंगरे, माजी सभापती प्रफुल खापर्डे, नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही स्वप्निल कावडे, ज्येष्ठ नेते कृष्णाजी तपासे, माजी अध्यक्ष युवक काँग्रेस संदीप कावरे, माजी नगरसेवक उमेश हिंगे, माजी नगरसेवक तुषार शिंदे,कल्पनाताई इंदुरीकर ,नितीन भाऊ कटारे,राजू हिंगणकर,शंकर भाऊ माहुरे ,राजूभाऊ दांडेकर, प्रमोद दांडेकर, ,प्रशांत भाऊ ढवळे, सुधीर पोहनकर सर,मनीष नंदेश्वर, सुधीर भाऊ पंदीलवार, यशवंत भाऊ वाघे,जावा भाई, विलास भाऊ डांगे,प्रदीप भाऊ तळवेकर ,निखिल डोईजड ,रीता अंबादे, पारस भाऊ नागरे, सोनू भाऊ कटारे ,मुरलीधर जी निमजे, नाना नंदनवार, शम्मी शेख ,तुळशीरामजी बनसोड ,किसन कुंमले, चंद्रशेखर गिरडे ,राकेश भाऊ साठवणे ,श्रीकृष्णा झिलारे ,अंकुश मेहरकुरे ,बंटी शिंदे तसेच काँग्रेस पक्षाचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील मंडळी उपस्थित होते .

Previous articleमुक्रमाबाद येथे राष्ट्रीय गायन कार्यक्रम संपन्न
Next article20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे खासदार आमदार यांच्या कार्यालया समोर घंटानाद आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here