Home गडचिरोली अबनपल्ली गावाच्या पुनर्वसन करण्याची मागणी..!! – माजी जि.प.अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांची...

अबनपल्ली गावाच्या पुनर्वसन करण्याची मागणी..!! – माजी जि.प.अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांची तहसीलदार यांना निवेदन..!!

125

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0022.jpg

अबनपल्ली गावाच्या पुनर्वसन करण्याची मागणी..!!

– माजी जि.प.अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांची तहसीलदार यांना निवेदन..!!

अहेरी/गडचिरोली,( सुरज गुंडमवार):-तालुक्यातील ग्रा.प.व्येँकटरावपेठा अंतर्गत येणाऱ्या अबनपल्ली गाव नदी काठावर वसलेली असून दर वर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे गावातील प्रत्येक घरा मध्ये पाणी घुसून दरवर्षी लाखोचा नुकसान होत असते तसेच त्या वर्षी पूर आल्याने गावकऱ्यांना गाव सोडुन पूर उतरेपर्यंत मुला बाळांना व पाळीव प्राण्यांना घेऊन बाहेर गावी जावून राहावे लागला.म्हणून गावकऱ्यांनी आपल्या गावातील समस्या घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे गेल्यावर आपण शासनाकडे अबनपल्ली या गावाला पुनर्वसनासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे म्हटले व लगेच निवेदन तयार करून आलेल्या गावकऱ्यांना धरून तहसीलदार साहेबाना निवेदन देण्यात आले.यावेळेस माजी जि. प.सदस्य अजय नैताम,नरेंद्र गर्गम , प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी व संपूर्ण अबनपल्ली गावातील नागरीक उपस्तीत होते..!!

Previous articleताहाराबाद येथे शरद जोशी यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.
Next articleमुरुमगाव येथे विविध समस्येच्या निराकरणासाठी भव्य चक्काजाम आंदोलन लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन घेतले मागे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.