Home नाशिक ताहाराबाद येथे शरद जोशी यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.

ताहाराबाद येथे शरद जोशी यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.

127

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0030.jpg

ताहाराबाद येथे शरद जोशी यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
शेतकरी संघटनेचे प्रणते व युगात्मा मा. दिवंगत नेते शरद जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन व याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
जयंतीच्या निमित्ताने ताहाराबाद व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर यांचे सभापती कृष्णा भामरे, संचालक संजय भामरे, बागलाण तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, जिल्हा युवा आघाडी किरण पाटील, भदाने सर, व गोकुळ भामरे यांनी शरद जोशी व शेतकरी संघटने याविषयी आपले विचार मांडले. तसेच याप्रसंगी शेतकरी संघटना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ही झाले. या उद्घाटनाचे उद्घाटक म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भदाने सर हे होते. तसेच पिंगळवाडे येथील युवक श्री गोकुळ भामरे यांना तालुका युवा आघाडी उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन नियुक्त करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिसरातील बहुतांश नागरिक व मान्यवर उपस्थित होते. त्यात दिलीप भामरे, दगडू बोरसे, सुभाष नंदन, सीताराम साळवे, नाना भामरे, कृष्णा भामरे,गणेश पवार, हेमंत बाविस्कर,चिंतामण चौधरी, प्रदीप कांकरिया, निखिल कासारे, संदीप साळवे, गजानन साळवे,डॉ उदय निकम, निकम सर, आबा सूर्यवंशी, गोकुळ भामरे, संदीप गांगुर्डे आदी नागरिक उपस्थित होते

Previous articleशहाजी मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित अनाथ मुलांना खाऊ वाटप
Next articleअबनपल्ली गावाच्या पुनर्वसन करण्याची मागणी..!! – माजी जि.प.अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांची तहसीलदार यांना निवेदन..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.