Home गडचिरोली 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे खासदार आमदार यांच्या कार्यालया समोर घंटानाद आंदोलन

20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे खासदार आमदार यांच्या कार्यालया समोर घंटानाद आंदोलन

136

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0027.jpg

20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे खासदार आमदार यांच्या कार्यालया समोर घंटानाद आंदोलन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सतत पूरपरिस्थिती निर्माण होत आहे व मेद्दीगड्डा व गोसेखुर्द येतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गा मूळे पूरपरिस्थिती तयार झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार – तीबार पेरणीच संकट आली. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या करण्यास सुरुवात केली तरी अश्या परिस्थिती असतांना सुद्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार, खासदार राज्य शासनाना कडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजुनी आर्थिक मदत करण्यासाठी आवाज उठवला नाही यावरून जिल्ह्यातील आमदार ,खासदार लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत आहेत की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे? जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले परंतु जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही भरीव निधीची मदत करण्यात आलेली नाही, अश्या निद्रा अवस्थेत असलेल्या सरकारला व स्थानिक आमदार खासदारांना जागे करण्या साठी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी करिता जिल्हा काँग्रेस च्या वतीने 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी सर्व सेल अध्यक्ष, काँग्रेस कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधवाणी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.

Previous articleचिमूरच्या क्रांतीभूमीत शहिद विरांना वाहिली श्रध्दांजली!
Next articleवानखेड येथे ग्रामपंचायत कार्यालय आठवडी बाजाराच्या दिवशी सामूहिक राष्ट्र गायन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.