Home बुलढाणा वानखेड येथे ग्रामपंचायत कार्यालय आठवडी बाजाराच्या दिवशी सामूहिक राष्ट्र गायन संपन्न

वानखेड येथे ग्रामपंचायत कार्यालय आठवडी बाजाराच्या दिवशी सामूहिक राष्ट्र गायन संपन्न

125

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0026.jpg

वानखेड येथे ग्रामपंचायत कार्यालय आठवडी बाजाराच्या दिवशी सामूहिक राष्ट्र गायन संपन्न

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी रवी शिरस्कार संग्रामपूर

यंदा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. यानिमित्तानं देशात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राज्यात 17 ऑगेस्ट रोजी या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे.
राज्यातील सर्व जनतेने बुधवारी सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आले होते.
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने सामूहिक राष्ट्रगायनाचा हा अनोखा कार्यक्रम राबविला आहे.या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन एक नवा विक्रम स्थापित करावा असे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सुचविले आहे.
आज संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे ग्रामपंचायत वतीने दि.17 ऑगेस्ट रोज बुधवार येथे सकाळपासून या सामूहिक राष्ट्रगायनाचे नियोजन केले होते.
बुधवार रोजी वानखेड येथे आठवडी बाजार भरत असतो त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात भरपूर गर्दी असते त्यामुळे या सामूहिक गायनामध्ये गावातील असंख्य नागरिकांनी सुद्धा सहभाग दर्शविला होता. तसेच या अमृत मोहोत्सवात ग्रापंचायत मधील कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्र गायनानंतर सर्वांना चहापाण्याची व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य,लिपिक,पाणीपुरवठा कर्मचारी, गावातील आशा सेविका,अंगणवाडी मदतनीस तसेच गावातील प्रतिष्टित नागरिक आदींचा समावेश होता.

Previous article20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे खासदार आमदार यांच्या कार्यालया समोर घंटानाद आंदोलन
Next articleनांदगांव शहरातील गांधी चौक येथे वर्मा जेवल्स चे संचालक, नंदलाल वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.