Home गडचिरोली जबलपुर चांदाफोर्ट एक्सप्रेस ट्रेनचा वडसा व नागभिड येथे स्टॉपेज देण्यात यावा. खा.अशोकजी...

जबलपुर चांदाफोर्ट एक्सप्रेस ट्रेनचा वडसा व नागभिड येथे स्टॉपेज देण्यात यावा. खा.अशोकजी नेते.

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0031.jpg

जबलपुर चांदाफोर्ट एक्सप्रेस ट्रेनचा वडसा व नागभिड येथे स्टॉपेज देण्यात यावा.
खा.अशोकजी नेते.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- 

जबलपुर चांदाफोर्ट या एक्सप्रेस ट्रेनचा शुभारंभ दिं. 30 जून रोजी होत असून जगात ट्रेनचा 50 किलोमीटर पर्यंत स्टॉपेज देण्यात आलेले आहे. परंतु खा.अशोकजी नेते यांच्या कार्यक्षेत्रामध्ये 225 किलोमीटर पर्यंत एकही स्टॉपेज देण्यात आलेले नाही. ही बाब खा.अशोकजी नेते यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ बिलासपूर रेल्वेचे जी.एम यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून गडचिरोली,चंद्रपूरच्या जनतेला सोयीस्कर होईल त्यासाठी वडसा व नागभिड येथे ट्रेनचा स्टॉपेज देण्यात यावा अशी मागणी खा. अशोकजी नेते यांनी केलेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमात्र वडसा हा एकमेव रेल्वे स्टेशन आहे. यामध्ये सुपरफास्ट,एक्सप्रेस ट्रेनचा स्टॉपेज वडसा येथेच देण्यात यावा.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल संबंधी अनेक प्रश्न पत्राद्वारे, निवेदनाद्वारे,केंद्रशासनाला पाठपुरावा करून यशस्वीपणे आपली बाजू मांडून जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या सोडवणारे किंवा रेल्वे संबंधी कोणतेही प्रश्न मार्गी लावून त्या मागणीला यश प्राप्त करणारे एकमेव खा.अशोकजी नेते सन 2018 मध्ये सुद्धा 6 महिन्यांकरिता दरभंगा एक्सप्रेसचा स्टॉपपेज देण्यात आलेला होता. परंतु आजही स्थिती तशीच आहे सुपरफास्ट एक्सप्रेस चा स्टॉपेज वडसा व नागभिड येथे देण्यात आलेला नाही.
त्याकरिता जबलपुर चांदाफोर्ट एक्सप्रेसला वडसा व नागभिड येथे स्टॉपेज देण्यात यावा. अशी मागणी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते,आम.कृष्णाजी गजबे, जिल्हा महामंत्री संजयजी गजपुरे,जि.उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा,तालुकाध्यक्ष राजु जेठाणी,माजी उपाध्यक्ष शालुताई दंडवते इत्यादीने मागणी केल्याने खा.अशोकजी नेते यांनी दखल घेत पाठपुरावा करून वडसा व नागभिड एक्सप्रेस स्टॉपेज देण्यात यावा अशी मागणी केली.

Previous articleवंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नेमणूकीचे निषेधार्थ पदाधिका-यांचा सामूहिक राजीनामा
Next articleमुंबईत राहूनही आमदार डॉ देवरावजी होळी घेतात आपल्या क्षेत्रातील रुग्णांची काळजी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here