Home गडचिरोली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नेमणूकीचे निषेधार्थ पदाधिका-यांचा सामूहिक राजीनामा

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नेमणूकीचे निषेधार्थ पदाधिका-यांचा सामूहिक राजीनामा

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0030.jpg

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नेमणूकीचे निषेधार्थ पदाधिका-यांचा सामूहिक राजीनामा

गडचिरोली, (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडी गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदावर असतांना जनतेची कोट्यावधी रूपयाची आर्थिक लुबाडणुक करून जेलमधुन परत आलेले बाळु टेंभुर्णे यांची पुन्हा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याच्या निषेधार्थ पक्षाचे जिल्हा सरचिटणीस केशव सामृतवार, जिल्हा प्रसिध्द प्रमुख विनोद आजबले यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत.
आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ पदाधिकारी असुन पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहोत. इतरही अनेक कार्यकर्ते या पक्षासाठी तळमळीने कार्य करीत आहेत. परंतु या सर्वांना डावलून पक्षाने जनतेची फसवणुक करणाऱ्या एका व्यक्तीची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली हा प्रामाणिकपणा जनसेवेचे काम करणाऱ्या कार्यकर्तेचा अवमान आहे.
वंचित बहुजन आघाडीत बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल या अपेक्षेने आम्ही या पक्षात काम करीत होतो. परंतु बहुजन समाजातील आमच्या सारख्या कार्यकर्तेची पक्षात गरज नसून गोरगरीब लोकांची फसवणुक करणारे कार्यकर्ते वरिष्ठांना जवळचे व महत्वाचे वाटतात. ही बाब दुर्देवी आहे. असे सामृतवार व आजबले यांनी सांगितले.
जनतेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत वंचित बहुजन आघाडीने बाळू टेंभुर्णे यांना पदावरून निष्काषीत केले होते. परंतु इतर सक्षम कार्यकर्तेना डावलून त्याच व्यक्तीची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याने कार्यकर्तेत मोठया प्रमाणात नाराजी पसरली आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा जनमानसात मलीन होत आहे. इतरही अनेक कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

Previous articleआदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालयातील निर्लेखित वाहन व साहित्याचा गुरुवारी लिलाव
Next articleजबलपुर चांदाफोर्ट एक्सप्रेस ट्रेनचा वडसा व नागभिड येथे स्टॉपेज देण्यात यावा. खा.अशोकजी नेते.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here