Home Breaking News *२२ जून १८९७* *रॅंडचा खून* ✍️पुणे ( विलास पवार ब्यूरो...

*२२ जून १८९७* *रॅंडचा खून* ✍️पुणे ( विलास पवार ब्यूरो चीफ युवा मराठा न्युज )

122
0

🛑 *२२ जून १८९७*
*रॅंडचा खून* 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्यूरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे 🙁 विषेश बातमी) ⭕ १९व्या शतकाअखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले. प्लेगला आळा घालण्याच्या निमित्ताने विल्यम चार्ल्स रॅन्ड या बिटिश अधिकार्‍याने लोकांचा छळ केला. लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. चापेकर बंधूंच्या मनात या अन्यायामुळे सूडाची ठिणगी पडली आणि आग धगधगू लागली..
राष्ट्र आणि धर्मप्रेमाच्या या जाज्वल्य भावनेतूनच चापेकरबंधू रॅंडच्या विरोधात पेटून उठले आणि २२ जून १८९७ला रॅंडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. २५ जूनला रॅंडचा मृत्यू झाला. आयर्स्ट तत्काल मृत्यू पावला.
दामोदर चापेकर यांना अटक होण्यासाठी बक्षिसाच्या लालचीने ब्रिटिश अधिकार्‍यांना मदत करणार्‍या द्रविड बंधुंना (रामचंद्र व गणेश शंकर द्रविड) वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांनी गोळ्या घालून ठार केले.
दामोदर १८ एप्रिल १८९८ला फाशी गेले. वासुदेव यांस ८ मे १८९९ रोजी, महादेव रानडे यांस १० मे आणि बाळकृष्ण चापेकर यांस १२ मे १८९९ रोजी येरवडा कारागृहामध्ये फाशी देण्यात आले.

दामोदर चापेकरांच्या फाशीपूर्व अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चापेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्यांनंतर सावरकरांनी चापेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-
*भक्ष्य रॅंड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे*॥
ही कविता लिहिली त्यावेळी *सावरकरांचे वय १५ वर्षे होते*.

*अश्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन*…..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here