Home Breaking News बेरोजगारांनी आता रोजगारासाठी “महास्वयम” संकेतस्थळावर नोंदणी करावी – नांदेड, दि. २२...

बेरोजगारांनी आता रोजगारासाठी “महास्वयम” संकेतस्थळावर नोंदणी करावी – नांदेड, दि. २२ : राजेश एन भांगे

114
0

बेरोजगारांनी आता रोजगारासाठी “महास्वयम” संकेतस्थळावर नोंदणी करावी –
नांदेड, दि. २२ : राजेश एन भांगे

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. एका बाजूला कंपन्यांना मनुष्यबळ पाहिजे तर रोजगार हवा असलेल्या कामगारांना काम हवे आहे. ही परिस्थिती लक्षता घेत शासनाने महास्वयम संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केला असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातून बरेच परप्रांतीय कामगार स्वगावी परत गेले आहेत. आता कारखाने, कंपन्या सुरु झाल्यामुळे कामगारांची कमतरता भासणार आहे. त्याचप्रमाणे ते कामगार बाहेरगावी नोकरी करीत होते ते स्वगावी नांदेड जिल्ह्यात परत आले आहेत. गरजूने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 02462-251674 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेडचे सहाय्यक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here