Home Breaking News (भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज) देवळा:-ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांची राज्यपाल...

(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज) देवळा:-ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती करा देवळा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन

513
0

(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा:-ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती करा
देवळा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन
महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे राज्य संघटक तथा जेष्ठ पञकार शिक्षण तज्ञ,छञपती क्रिडा पुरस्कार विजेते,अष्टपैलू वस्ताद संजयजी भोकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर निवड करावी या मागणीचे देवळा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की,राज्यपाल कोट्यातून लवकरच विधानपरिषदेसाठी १२ सद्यस्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.कायद्यानुसार राज्यपालांच्या कोट्यातून पत्रकार,विचारवंत,साहित्यिक,कलावंत यांची नियुक्ती करण्यात येते त्याअनुषंगाने पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ संपादक,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक तथा श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी राज्यातील पत्रकारांची अपेक्षा आहे.संजय भोकरे पञकारितेत खूप वर्षापासून कार्यरत आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या माध्यमातून पञकारांसाठी न्याय हक्कासाठी राज्यभर जाळे निर्माण केले.पञकार संघात आघाडीच्या चॅनेल ,दैनिकाचे संपादक ,वृत्तसंपादक, जेष्ठ पञकार तसेच बातमीदार ,वार्ताहर जोडले गेलेले आहेत.पञकार संरक्षण कायदा लवकर अंमलात यावा यासाठी त्यांनी स्वतंत्र लढा दिला व कायदा संमत करुन घेतला तसेच राज्य पञकार संघाबरोबर पूर्ण देशभरात पञकारांचे व्यासपीठ असावे म्हणून ऑल इंडिया जर्नालिष्ट ची स्थापना केली राजधानी नवी दिल्लीत मोठे कार्यालय सुरु आहे.

प्रत्येक वर्षी पञकार संघाचे राज्य अधिवेशन संपन्न होते त्यात पञकारांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा करुन ठराव शासनाकडे पाठवून पाठपुरावा केला जातो.राज्यातील बहुतांशी शहरात पञकार भवन उभे केले.पञकारांच्या पाल्यांना शिक्षणात सवलती तसेच ग्रामीण भागातील पञकारांना सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.पञकारांना संघटनेच्या मार्फत पाच लाखाचा विमा संरक्षण दिले.
संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असलेल्या महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे कार्य उल्लेखनीय आहे. जेष्ठ पञकार ,छञपती क्रिडा पुरस्कार विजेते शिक्षण तज्ञ संजयजी भोकरे यांच्या पञकारितेतील,संघटनेतील ,क्रिडा ,शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत एक पञकारांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्य पदासाठी संधी द्यावी या मागणीचे निवेदन देवळा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देवळा तहसीलदारांमार्फत देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे देवळा तालुका अध्यक्ष दिनेश सोनार,जिल्हा पदाधिकारी मिलिंद पगार,पंडित पाठक,सोमनाथ जगताप,संपर्क प्रमुख विनोद देवरे,सदस्य भिला आहेर,खंडू मोरे,महेश शिरोरे,अमित पाटिल,अदिनाथ ठाकूर,वैभव पवार आदींसह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here