Home विदर्भ अकोला जिल्ह्यात डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने खळबळ

अकोला जिल्ह्यात डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने खळबळ

247
0

राजेंद्र पाटील राऊत

अकोला : ( सतिश लाहुळकर  ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-  अकोला जिल्ह्यात एकीकडे कोरोनाव्हायरस संक्रमण कमी होत असताना जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली या बाबत आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी माहिती देत हा रुग्ण अकोट येथील रहिवासी असून 29 जून रोजी त्याला उपचाराकरिता अकोला कोवीड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते अशी माहिती त्यानी दिली.

दर महिन्यात शंभर सॅम्पल दिल्ली येथील लॅबला पाठवण्यात येतात त्यामध्ये या रुग्णाचा सॅम्पल जीनोमिक सिक्वेसिंग ला पाठवण्यात आला होता. बुधवारी सी एस आय आर आय जी आय बी प्रयोगशाळेने 20 डेल्टा प्लस रुग्ण शोधून काढले आहेत.

त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील रुग्णाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी दिली त्यानंतर अकोला आरोग्य विभागचे एक पथक अकोट कडे रवाना करण्यात आले आहे. संबंधित रुग्ण ची प्रकृति सध्या ठीक आहे व त्याच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे नमुने या आरोग्य पथकाद्वारे घेण्यात येत आहेत अशी माहिती डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी दिली. माहिती सूत्रानुसार आहे

Previous articleबूलढाण्याचे माजी खासदार स्वश्री बालकृष्ण वासनिक यांच्याजयंतीनिमित्त सूजातपूर येथे आदरांजली वाहताना
Next articleपालघरमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here