Home कोल्हापूर लिंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हासंघटकपदी चंद्रकांत पाटील यांची निवड.

लिंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हासंघटकपदी चंद्रकांत पाटील यांची निवड.

137
0

राजेंद्र पाटील राऊत

लिंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हासंघटकपदी चंद्रकांत पाटील यांची निवड.

कोल्हापूर प्रतिनिधी: लिंंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हयाच्या जिल्हासंघटकपदी चंद्रकांत गजानन पाटील ( पेठ वडगाव ) यांची निवड करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांचे सामाजिक ,धार्मिक कार्य लिंगायत समाज बांधव व त्यांच्या प्रश्नाविषयी असलेली जाण ते प्रश्न कसे सुटतील यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न
करण्याचे कल्पक व्यक्तिमत्व असलेले चंद्रकांत पाटील यांची लिंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हासंघटकपदी निवड झाली आहे. लातूर येथे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी निवड जाहीर केली.
लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार महाराष्ट्रभर लिंगायत समाज बांधवाचे जोरदार संघटन करीत आहे.त्यामुळें महाराष्ट्रातील तरुणांचा ओढा लिंगायत महासंघ या प्रमाणिक संघटनेकडे वाढला आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी कोल्हापुर जिल्हयातील सर्व तालुक्यातील लिंगायत समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची निवड प्रा.सुदर्शनराव बिरादारांनी केली आहे.अशी माहिती लिंगायत महासंघाचे सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील यांनी दिली.
चंद्रकांत गजानन पाटील यांची निवड झाल्याबद्दल लिंगायत महासंघाचे सर्व प्रदेश कार्यकारिणी पदाधिका-यांनी चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.मुंबई, लातुर ,सोलापुर,उस्मानाबाद, नांदेड,सातरा, परभणी औरंगाबाद पुणे
या जिल्हयाच्या जिल्हाध्यक्षांनीही अभिनंदन केले आहे.जिल्हा व शहर कार्यकारिणी , तसेच तालूका पदाधिका-यांच्याही लवकरच निवडी केल्या जाणार असल्याचे सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here