Home कोल्हापूर स्वर्गीय शिवाजीराव सालपे फौंडेशनने उभारले मोफत कोविड केअर सेंटर

स्वर्गीय शिवाजीराव सालपे फौंडेशनने उभारले मोफत कोविड केअर सेंटर

106
0

राजेंद्र पाटील राऊत

स्वर्गीय शिवाजीराव सालपे फौंडेशनने उभारले मोफत कोविड केअर सेंटर
( युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर)
पेठ वडगाव : माजी नगराध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव सालपे फौंडेशनच्या वतीने सुरू केलेले मोफत कोव्हीड उपचार केंद्र रुग्णाच्या सेवेसाठी महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास डॉ.प्रवीण हेंद्रे यांनी व्यक्त केला.केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाआघाडीच्या नेत्या प्रवीता सालपे , नगराध्यक्ष मोहनलाल माळी , जेष्ठ मागदर्शक नेते रंगराव पाटील बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी होत असलेला खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याने गावातील गरजू रुग्णांसाठी स्व.सालपे फौंडेशनने एस.टी.स्टॅण्डजवळील हेंद्रे हॉस्पिटलमध्ये कोव्हीड केंद्र सुरू केले आहे.
यावेळी नगराध्यक्ष माळी यांनी , फाऊंडेशनने सामाजिक बांधीलकीतून कोव्हीड केंद्र सुरू करून रुग्णांची मोठी सोय शहरात उपलब्ध केली आहे.
युवक क्रांती आघाडीचे मार्गदर्शक रंगराव पाटील यांनी हे कोव्हीड सेंटर गोरगरिबांसाठी मदतीचा हात देणारे ठरणार आहे या केंद्रातून रुग्णांना चांगली सुविधा दिली जाईल असे मत मांडले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.अविनाश तेली यांनी डॉ.हेंद्रे यांच्या सहकार्यातून फौंडेशन ने कोव्हीड केंद्र सुरू केले आहे.या केंद्रातील रुग्णांसाठी भोजनाची व्यवस्था नगरसेवक संतोष गाताडे यांनी केली आहे.तर डॉ.नरेंद्र पाटील यांनी उपचारासाठी योगदान दिले असल्याचे सांगीतले.
यावेळी फौंडेशनचे उपाध्यक्ष राजवर्धन बावडेकर यांनी दहा हजार रुपये देणगी , युवक राष्ट्रवादी शहर काँग्रेस तर्फे 100 पीपीई किट , महेश माळी यांच्याकडून सॅनिटायजर भेट देण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत फौंडेशनचे अध्यक्ष अभिनंदन सालपे , उपाध्यक्ष राजवर्धन पाटील बावडेकर , धैर्यशील यांनी केले.
या कार्यक्रमास डॉ.मिलिंद हिरवे , नगरसेवक कालिदास धनवडे , दशरथ खोत , संतोष गाताडे , अलका गुरव , संदीप पाटील , मैमून कवठेकर , शबनम मोमीन ,सावित्री घोटणे , माजी नगरसेवक अशोक झगडे,रमेश बेलेकर , दीपक खरोशे , गौतम गोंजारे, रमेश शिंपणेकर , शरद काशीद , संतोष ताईंगडे, चंद्रशेखर वाडेकर , जमशिद मोमीन , यांच्यासह फौंडेशन व महाआघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleलिंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हासंघटकपदी चंद्रकांत पाटील यांची निवड.
Next articleभादोले कोविड केअर सेंटरला सर्वतोपरी मदत करू : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here