राजेंद्र पाटील राऊत
भादोले कोविड केअर सेंटरला सर्वतोपरी मदत करू : भाजपा प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांतदादा पाटील
पेठ वडगांव (वार्ताहर): कोरोना संकटात भादोले येथे सुरु झालेले कोविड केअर
सेंटर भादोले ग्रामस्थांची सोय ठरले आहे. या अलगीकरणा केंद्रात
सेवाभावाने काम करणार्या लोकांमुळे भादोले ग्रामास्थातून समाधान व्यक्त
होत आहे. कोरोना महामारीत अनेक कुटुंबे अडचणीट आली आहेत. या अडचणीच्या
काळात सेवाधर्म अत्यंत महत्वाचा आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी सर्व
घटकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री
चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. भादोले येथे सुरु झालेल्या कोविड केअर
सेंटर व अलगीकरण केंद्रास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी माजी
मंत्री पाटील यांनी दिले.
भादोले व परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजपा प्रदेक्षाध्यक्ष व
माजी मंत्री चंद्रकातदादा पाटील सोशल फौंडेशन, भाजप किसान मोर्चा व
भादोले ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भादोले येथे कोविड केअर
सेंटर व अलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रास माजी मंत्री
चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देवून मार्गदर्शन केले.
यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा कोरोना योद्धा म्हणून
माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, स्वामी सेवानंद महाराज यांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला व त्यांना साडी वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना नाना जाधव म्हणाले, भाजपा प्रदेक्षाध्यक्ष व माजी
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून शासनाची मदतीवर
अवलंबून राहण्यापेक्षा येथे स्वतःच्या खर्चातून गत वर्षीच्या महापुराच्या
काळात वारणा खोर्यात मोठी मदत केली. जनावरांना चारा, गरजूंना अन्न धान्य,
कपडे, भांडी अशी मोठी मदत माजी मंत्री पाटील यांनी केली आहे. सध्या
भादोले व परिसरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोविड केअर सेंटर व
अलगीकरण केंद्र सुरु करण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी मदत व मोलाचे
मार्गदर्शन केले.
यावेळी स्वामी सेवानंद महाराज, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव माने,
सरचिटणीस विठ्ठल पाटील, तालुकाध्यक्ष राजेश पाटील, सरपंच आनंदराव कोळी,
भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नाना जाधव, ग्रा.पं.सदस्य विक्रम
माने, अलका पाटील, शहाजी घोलप, सुरेश पाटील, संतोष पाटील, जिनेन्द्र
देसाई, भूपाल कांबळे, अर्जुन जामदार,हेमंत पाटील, सचिन नांगरे, सुहास
राजमाने,ग्रामसेवक शामसुंदर मुसळे, तलाठी तुषार भोसले आदी उपस्थित होते.