Home सामाजिक आदर्श सर्वसंपन्न राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 

आदर्श सर्वसंपन्न राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 

287
0

राजेंद्र पाटील राऊत

आदर्श सर्वसंपन्न राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सामान्य मेंढपाळ कुटुंबात जन्म घेऊन अखंड जगाला लाजवेल असे कार्ये करुन, राजमाता अहिल्यादेवी होळकर एक सर्वस्व पन्हाला लावून जनसेवा करणारे नेतृत्व असे समस्त नवयुकांन पुढे आदर्श नारी म्हणून प्रत्येकाच्या मनावर आपले प्रतिबिंब कोरल अशा महान रणरागीणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात १ मे १७२५ रोजी मानकोजी शिन्दे व सुशिला शिंन्दे यांच्या उदरी मौजे चोंडी ,जि. अहमदनगर येथे झाला. एका कौशल्यवान कन्यारत्नाने जन्म घेतला .याच कौतुक सर्वञ होऊ लागले . मानकोजी शिन्दे हे त्याकाळी गावाचे पाटील होते.चार गावात त्याचा मान सन्मान हा होताच . पण त्यांची ओळख ही त्यांच्या दुरदृष्टी विचांरानमुळे निर्मण झाली होती. अहिल्यादेवी होळकर पण लहानपणापासून चेतूर व बुध्दीमान होत्या. मानकोजी शिन्दे यांनी आपल्या चिमुकलीचे सामर्थ्य जानून शिक्षणाचे धडे दिले. त्या काळी स्ञी ही शिक्षणापासून वंचित होती. पण मानकोजी शिन्दे स्ञी – पुरुष भेद न करता आपल्या मुलीला शिक्षणाचे धडे देत. अहिल्यादेवी होळकर आठ वर्षाच्या असताना मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्याचे सुभेदारा होते. माळवा प्रांतावर राजा होता ,एक बलाढ्य योध्दा म्हणून मल्हारराव होळकरांची ओळख होती. मल्हारराव होळकर हे पुणे येथे जात असताना चोंडी येथे मुक्काम पडला . तेथेच आपल्या फौजेसह राजे मल्हाराव थांबले . आपल्या घोड्यांचा पागा ठोकला . वेळ सायंकाळची होती आहिल्यादेवी होळकर यांना घोडेस्वारीची आवड होती . घोड्यांच्या पाग्यापाशी येऊन आपल्या कोमल नजरेने घोड्यांना पाहत होत्या. तितक्यात मल्हाररावांची नजर ह्या चिमुकल्या मुलीवर पडली व त्यांनी आपल्या पहील्याच नजरेत अहिल्यादेवीची बुध्दी व चातृर्याची पारख केली.व विचार केला जर ही आपल्या खंडेरावांच्या पत्नी झाल्या तर आपल्या राज्यास बळकटी मिळेल . क्षणाचा ही विलंब न करता गावच्या मालीपाटलाला घेऊन मल्हाररावानी मानकोजीकडे आपला मुलगा खंडेराव यांच्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांची मागनी केली. पुढे सन१७३३ मध्ये खंडेराव व अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह झाला. आहिल्यादेवी मल्हारराव होळकरयांच्या सुन म्हणून महेश्वर येथे आल्या खेळण्यांच्या बागडण्याच्या वयात एक पत्नी म्हणून आपल्या संसारात गुरफटल्या. पुढे मल्हारराव होळकर यांनी आहिल्यादेवी होळकर यांना घोडस्वारी, तलवारबाजी , दांडपटा युध्दनीतीचे शिक्षण दिले . व काही काळातच आहिल्यादेवी सर्व युद्धनितीचे शिक्षण घेऊन पारंगत झाल्या. त्याबरोबरच राज्यकारभार कसा चालवायचा हे मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी शिकविले . मल्हारराव होळकर लढाईला गेले की बरेच दिवस आपल्या राज्यकारभाराची जबाबादारी ही अहिल्यादेवी होळकर सांभाळत असत.
आहिल्यादेवी होळकर यांना मुक्ताबाई व मालेराव होळकर अशी दोन दांम्पते जन्मास आली. पण नैतीला हा सुखी संसार मान्य नसावा सन १७५४ मध्ये कुंभेरच्या लढाईत खंडेराव होळकर शहिद झाले.पण जेथे दिल्लीच्या दरबारात छञपती शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभा केले म्हणून छञपती शिवाजी महाराज दिल्ली दरबार त्यागला ते तेथुन निघून आले. नंतर तीच गोष्ट त्याच दरबारात ८७ वर्षानी घडली , औरंगजेबचा तत्कालीन वारसदार काजूदिन खान त्या दिल्लीच्या तक्तावर बसलेला आणि त्यास कळाले की सुभेदार मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव दिल्ली मध्ये आला आहे .लगेच बादशाहाने पञ पाठवल व म्हणाले ” खंडेराव आपण दिल्लीच्या तक्तास भेट द्यावी आम्ही आपणास खिलत देणार आहोत, त्यावर खंडेराव म्हणतात मी काय तुझा गुलाम नाही तुमच्या खिलती घेण्यास मी श्रीमंत मल्हारराव होळकरांचा मुलगा मग बादशाहा दुसरे पञ लिहीतात व म्हणतात तुम्ही आमच्या महलात स्नेह भेट घ्या ” आणि मग खंडेराव होळकर त्या बादशाहाच्या दरबारात जातात. व वरदी दिली श्रीमंत मल्हारराव होळकरांचे चिरंजीव खंडेराव होळकर दरबार मे पदार रहे है , वा बादशाहा ताडकन बसला व पाहु लागला खंडेराव होळकर कुठे उभा रहातो खंडेरावाचे उभारण्याचे स्थान निच्छित होताच बादशा म्हणतो खंडेरावांना पहिल्या रांगेत बसवा आहे त्यावेळी बादशाहाच्या म्हणण्या प्रमाणे खंडेरावांना पहिल्या रांगेत बसवल . आणि मग मानाचे ताट ५०० मोहरे व तलवार भेट म्हणून वजीर घेऊन आला त्यावर खंडेराव बोलले जर तुमच्या बादशाहाला जर खरच खिलत देयावयाची असेल तर तुझ्या त्या बादशाहाने स्वतःहा तकतावरुन खाली याव व ही तलवार वाकून माझ्या कमरेला बांधावी अखा दरबार गाजला आता काय होणार पण बादशाहा स्वतः तक्तावरुन खाली येऊन तलवार खंडेराव होळकर यांच्या कमरेला बांधली ज्या दिल्ली दरबाराची वचक जनमाणसात होती त्या दरबाराचा अपमान खंडेरावानी केला व शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला महाराष्ट्रातून सर्व प्रथम खंडेरावानी घेतला .पण नियती पुढढे काय चालणार अहिल्यादेवी होळकर यांची सवती सती गेल्या पण मल्हारराव होळकर यांच्या सांगण्यावरुन अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत.व सती प्रथे सारख्या जाचक प्रथेचा विरोध करुन ही प्रथा मोडीत काडली. पुढे मल्हारराव होळकर हे आपल्या माळवा राज्याच्या अनेक विभागाची सुञे पुर्णता अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे सोपवली. एक दुःख सारुन पुन्हा राज्य वाढवण्याचे काम करत असातानाच नितीने घाला घातला हाताला आलेले पोर मालेराव होळकर यांचे सन 1766 मध्ये निधन झाले . व होळकर परिवाराचा वारसा हिरावला . पण स्वतःला खचु न देता . 18 व्या शतकात नर्मदा नदी काठी राजधानी महेश्वर माळवा प्रांतात पुन्हा उद्योग वाढावेत यासाठी टेवल्सटाइल इंडस्ट्री , महेश्वरी साहित्य , मुर्तीकला , संगीत, अशा व्यवसायांना वाव देवून आर्थिक दृष्ट्या सदृढ होण्यसाठी जनतेला मदत करण्यास सुरुवात केली. आज भारत शासन जेव्हा आए.टी . आए . ची निर्मिती केली तेव्हा त्याची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांनी चालवलेल्या उद्योगांना पाहून केली. तसेच अहिल्यादेवी होळकर राजधानीच्या मुख्य तिर्थस्थानावर गुजरात व्दारका, काशी विश्वनाथ , नाशिक , विष्णूपुरी , वैजनाथ अशा ठिकाणी धर्मशाळा स्थापन करुन गोरगरीब जनतेच्या आधारांचे ठिकाणे निर्माण केले. पुन्हा एकदा नितीने घाला घातला भरल्या शिवारातीर कनस जसी कापावीत तसे शञु सैनिक कापनारा छञपती स्वराज्याचा झेंडा अटकेपार लावानारा सुभेदार मल्हारराव होळकर यांचे निधन झाले. एकीकडे दुःख व दुसरीकडे राज्य साभांळण्याची जबाबदारी हे समजून पुन्हा होळकर राज्याची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली . सत्याचा मंञ वापरुन विकास तंञ ह्या हिंन्दुस्थानच्या मातीत निर्माण केले. पुढे शेती विकासासाठी शेती तलावाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. आज जो जलयुक्तशिवार ही शासन योजना राबते ती ३५० वर्षापूर्वी सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांनी केली. शेतसारा अशा नवीन उपक्रमातून शेतकऱ्यांना सुट देऊन शेतकऱ्यांना मानाची वागणूक छञपती शिवाजी महाराजा नंतर आहिल्यादेवी होळकर यांनी दिली. शेतकऱ्यांना शेती करात सुट देऊन त्यांना स्वबळावर उभ केल अनेक नवउद्योगाना माळवा प्रांतात चालना दिली. नाले , ओढे , विहिरी बांधल्या . मल्हारराव होळकर यांची इंदोरची राजधानी राजवाडा पैलेस हे स्वप्न राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर राहिलेले काम पुर्ण करुन महेश्वर वरुन राजधानी इंदौर येथे नेली. व पुढील राज्यकारभार इंदौर येथून चालवला.
मोगलांच्या आक्रमणानी व मोगलांनी केलेलेल्या मंदिराची नासधुस ह्यावर विचार करुन मोगलांनी पाडलेली मंदिरे दुरुस्त व पुर्णनिर्माण केली.
राजमाता ह्या.जातीप्रथेच्या कठर विरोधी होत्या त्या नितीशास्ञ, राज्यशास्ञ , धर्मशास्ञ, अर्थशास्त्रात निपुण होत्या . वेळप्रसंगी ज्ञाना सोबतच त्या तलवार उचलवण्यात ही तरबेज होत्या. खंडेराव होळकर अहिल्यादेवी होळकर यांचे कौतुक करत असताना म्हणत ” मी युध्दात तरबेज आहे पण मला धर्मशास्ञ मला कधी कळले नाही, ही उनीव अहिल्यादेवी नी पूर्ण केली.” असे अभिमानाने सांगत. आता राज्य चालवत असताना अनेक विरोध्दकाना तोंड देण्यासाठी अहिल्यादेवी सतत तयार असत . पण आपलीच माणस विरोध करत होती होळकर राज्याचा दिवान गंगोबा चंदडजुड हा फितूर झाला व त्यांने पेशवा राघोबा यांच्याकडे अहिल्यादेवी ही अबला आहे त्यांना राज्य चालवणे जमत नाही. तुम्ही त्यांच्या राज्यावर आक्रमण करा व राज्य काबीज करा , ह्यावर राघोबा पेशवा तीस हाजाराची फौज तयार केली . हा डाव अहिल्यादेवी होळकर यांना समजताच त्यांनी पेशवा राघोबा यांना पञ लिहुन म्हणतात .” तुम्ही आसे समजू नका मी स्ञी आहे, वेळ प्रसंगी मी तलवार घेऊन रंणानगणात उतरेन माझ्या सोबत माझी पाच हजाराची महिला फौज असेल, मी हरलो तरी लोक मला स्ञी आहे असे म्हणतील पण तुम्ही हारलात तर तुमची नामोसकी होईल . आली भेट रणांगणावर होईल. ” असे कडवे बोल ऐकून पेशवे आक्रमण करणे थांबवले व होळकर राज्यास येऊन मिळाले. सर्व प्रथम महीला सैनिक फौज तयार करणाऱ्या आहिल्यादेवी होळकर ठरल्या. अहिल्या देवी होळकर ह्या ४३ कि.लो.चा भाला वापरत असत, ह्यावरुन समजते कि त्या किती युध्दनितीत निपूण होत्या. आहिल्यादेवी होळकर ह्या हुंडाबंदी , सतीप्रथा , अशा अनेक कायद्यांच्या सुञधार म्हणून ओळखल्या जातात. ३५० वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर इंग्रज व फ्रेंच यांना ओळखून होत्या त्या म्हणत जर इग्रजांना आपण आज थारा दिला तर पुढे ते आपल्यावर राज्य करतील पुढे तसेच घढले. यावरुन त्यांचि दूरदृष्टी दिसुन येते.
राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच सर्व इतिहास हा क्रांतीकारी आहे. त्याचा भावअर्थ असा होतो. त्यागाला ही लाज वाटावी इतका महान त्याग , तुझ्या त्यांगानेही जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान आशा जागतिक किर्तीच्या तबल २९ वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकृत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्रअभिवादन . 💐 💐
लेखक :- अॕड. गजानन प्रकाश देवकत्ते

Previous articleभादोले कोविड केअर सेंटरला सर्वतोपरी मदत करू : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
Next articleसोलापूर जिल्ह्यातील या दोन युवा सरपंचांची मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here