Home बुलढाणा पर्यटन स्थळ अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांची लूट

पर्यटन स्थळ अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांची लूट

134

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0109.jpg

पर्यटन स्थळ अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांची लूट

(   बुलढाणा युवा मराठा ब्युरो टिम)

तालुक्यातील आदिवासी गाव वसाली येथे पर्यटकांसाठी अंबाबरवा अभयारण्याची निर्मिती करण्यात आली असून येथील अधिकारी व कर्मचारी नियमबाह्य वसुली करून दादागिरीची भाषा पर्यटकासोबत वापरतात या गंभीर विषयाकडे वरिष्ठांनी जातीने लक्ष देऊन या मुजोर कर्मचाऱ्यांना वरिस्ट अधिकारी यांनी समज द्यावी अशी मागणी परिसरातील पर्यटन करीत आहेत.
दि. 21 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने परिसरातील पर्यटन वसाली येथील इको सायन्स पार्क पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. या पार्कचे 12 वर्षावरील व्यक्ती साठी 20 रुपये तर लहान मुलांसाठी 10 रुपये शुल्क आकारण्यात आले असून चार चाकी, दुचाकी पार्किंग शुल्क वेगळे आकारण्यात आले होते. पण मात्र त्या दिवशी गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी काही ओळखीच्या लोकांना कोणतेही शुल्क न आकारता काही सदर पर्यटकांचे दुचाकी,चारचाकी वाहन सुद्धा डायरेक्ट इको सायन्स पार्क मध्ये आत मध्ये नेण्याची परवानगी दिल्याचे निदर्शनात आले होते आणि एकीकडे काहीं पर्यंटकांसोबत हेच कर्मचारी यांनी वाद घालून दादागिरीची भाषा वापरून पर्यटकांना वेठीस धरले. त्याकरिता असल्या मुजोर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पर्यटन करीत आहेत.

पुरावा तत्वाकरिता सदर कर्मचाऱ्यांची असलेल्या सीसीटीव्ही फुटेज बघून कारवाई करावी दिनांक 21 ऑगस्ट रोजी आम्ही आमच्या कुटुंबवासी सह इको सायन्स पार्क पाहण्यासाठी गेलो असता गेटवरील कर्मचाऱ्यांनी विनाकारण जास्त शुल्क आकारले त्यांना पावती मागितली असता दिली नाही व दादागिरीची भाषा वापरली तसेच इको पार्क मधील हॉटेल ग्रीन पार्क मध्ये सुद्धा अरेरावीची भाषा हॉटेल चालक वापरत होते या सर्व प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज पाहून या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
शेख अनिस वरवट,रवि शिरस्कार, पर्यटक

Previous articleउपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने संग्रामपूर तालुक्यातील 42(ड) भूखंड रद्द करण्याचा आदेश!
Next articleश्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.