Home बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने संग्रामपूर तालुक्यातील 42(ड) भूखंड रद्द करण्याचा आदेश!

उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने संग्रामपूर तालुक्यातील 42(ड) भूखंड रद्द करण्याचा आदेश!

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0114.jpg

उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने संग्रामपूर तालुक्यातील 42(ड) भूखंड रद्द करण्याचा आदेश!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यात भूमाफिया चांगले सक्रिय असून तालुक्यातील काही महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व नियम धाब्यावर ठेवून अनधिकृतपणे केलेले 42 (ड) भूखंड रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांनी दिले असून, त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील भू माफीयात एकच खडबड उडाली असल्याचे पहावयास मिळत आहे. संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांत शेंकडों एकर जमीन भू माफिया व संबंधित अधिकाऱ्यांनी हात मिळवणी करून सर्व नियम धाब्यावर ठेवून आकृषक करून 42 ड चे ले आऊट पाडण्यासाठी अधीकारी व काही भु माफीया सक्रीय आहेत या गैरप्रकारांची चैकशी करून दोशी अधिकाऱ्यांवर नीलंबनाची कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील ग्राम चागेफळ येथील समाधान दहीभात यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे कडे केली आहे. पण आता असे भुखंड रद्द करण्याचे काम उपवीभागीय अधिकारी जळगाव जा करीत आहेत . परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनधिकृत पणे केलेले 42 रद्द करण्यासोबतच असे चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा करावी अशी मागणी समाधान दहिभात यांच्याकडून होत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील भूखंड माफिया तलाठी मंडळ अधिकारी प्रभारी ना तहसीलदार यांनी संगत मत करून शासनाची दिशाभूल करत 42 ड चे आदेश काढुन जमीनीवर अकृषक ले आऊट पाडले यात मोठा अर्थ पूर्ण व्यवहार झाल्याचे बोलल्या जात आहे सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचे समजते तरी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे कडे तक्रार करूनही हे प्रकार असेच चालू राहणार की दोशीवर कारवाई होणार की..? याकडे तालुका वाशीयांचे लक्ष लागले आहे.

Previous articleउदयोन्मुख कवयित्री दीप्ती यादव यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या गुणगौरव कार्यक्रमात सत्कार
Next articleपर्यटन स्थळ अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांची लूट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here