Home बुलढाणा ह्या आजी आजोबांनी केलेला हा अतरंगी डान्स पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा...

ह्या आजी आजोबांनी केलेला हा अतरंगी डान्स पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220705-WA0002.jpg

ह्या आजी आजोबांनी केलेला हा अतरंगी डान्स पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
असं म्हणतात की माणसाच्या जगण्याला कोणत्याही मर्यादा नसाव्यात. मिळालेलं जीवन आपण दिलखुलासपणे जगलं पाहिजे. पण प्रत्यक्षात मात्र कित्येकांना अशा प्रकारे जगणे जमत नाही. अनेक लोक फक्त बोलतात पण समाधानी आणि आनंदी असणं, ही खूपच दुर्मीळ गोष्ट झाली आहे. भौतिक सुख, स्टँडर्ड लाइफस्टाइल, लोकांना आपण ग्रेट वाटणं, या सगळ्या गोष्टींना आपण सुख मानत असतो. आजकाल तर तुम्ही सोशल मीडियावर कसे दिसता आणि वावरता त्यावर तुमचं सुख समाधान लोकं आणि आपण स्वतःही ठरवत असतो. पण त्यापलीकडे जाऊन अनेक लोक असेही आहेत, ज्यांना सोशल मीडियाचा किंवा इतर तुमच्या भौतिक सुखांचा गंध नाही. मात्र तरीही ते आपलं कष्टाचं आयुष्य खूप सुखाने जगत असतात. अशाच एका गावठी आणि कष्टकरी वयस्कर जोडप्याचा व्हिडीओ आमच्या टीमकडे आला आणि आमच्या तोंडून आलं की हेच खरं सुख आहे यार…

सोशल मीडियावर रोज अक्षरशः व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ चालू असतो. भारी गोष्ट म्हणजे सेलेब्रिटी सोडता सगळ्या लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओजमध्ये लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत, गाण्या-नाचण्यापासून तर अपघातापर्यंत, भांडणापासून तर चोऱ्यापर्यंत…
सगळे सगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता भारतात देशाबाहेरचे व्हिडीओ सुद्धा आवडीन पाहिले जातात. आता आमच्याकडे आलेला व्हिडीओ हा एका आजी आजोबांचा आहे. जे एका भारी भन्नाट मराठी गाण्यावर मनसोक्तपणे नाचत आहेत. हे जोडपं गावाकडचे आहे. त्यांनी काही विशेष वेगळा डान्स केला नसला तरीही त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. कारण त्यांनी जो डान्स केला आहे तो एकदम मनापासून आहे. परिपूर्ण आणि ओरिजिनल आनंदाने केलेला हा असा डान्स तुम्हाला कोणत्याही डान्स रियालिटी शो मध्ये बघायला मिळणार नाही. कारण कार्यक्रमात लोक टाळ्यांसाठी नाचतात, इथे नाचलेले आजी आजोबा हे स्वतःसाठी स्वआनंदाने नाचलेले आहेत. त्यातही त्यांची भारी बॉंडिंग बघून तर हा डान्स अजूनच खुलून आलेला आहे, अस वाटत राहतं. कुठलाही संकोच न बाळगता त्यांनी केलेला डान्स हा सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. आणि डान्सपेक्षा त्यांच्या या भन्नाट बॉंडिंग आणि आयुष्य जगण्याच्या कलेसाठी जास्त कौतुक होत आहे. याच कारणामुळे हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

Previous articleअनसिंग गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामाच्या ठिकाणी शासन नियमानुसार माहिती फलक लावण्याची मागणी       
Next articleगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देशमुख मराठा समाज मंडळ मेहकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here