Home नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वाडी-वसतीवर शासन आपल्या दारीची उत्सुकता

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वाडी-वसतीवर शासन आपल्या दारीची उत्सुकता

117
0

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0047.jpg

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात
वाडी-वसतीवर शासन आपल्या दारीची उत्सुकता

ग्रामीण भागात· जिल्हा प्रशासनातर्फे शासकिय योजनाच्या मेळाव्यावर भर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड (जिमाका) दि. 19 :- जनसामान्यांना त्यांच्या शंका समाधानासह शासकीय योजनांचा लाभ पोहचविणाऱ्या शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमाबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मंडळाच्या ठिकाणी असलेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे मेळावे आयोजित केले जात आहेत. यासाठी गावपातळीवरील दवंडी पासून ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सहाय्यक, कृषि सहाय्यक, अंगणवाडी सेविका या सर्वांचा समन्वय साधला जात असल्याने लाभार्थ्यांच्या विविध प्रकरणांना तात्काळ मंजुरीचे प्रमाण जलदगतीने वाढल्याचे तहसिलदार डॉ. व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले.

लोहा तालुक्यातील किवळा व इतर मंडळांच्या ठिकाणी जवळ असलेल्या गावांमध्ये आम्ही शासन आपल्या दारी उपक्रमाच्या प्राथमिक फेरीस आयोजित करत आहोत. या मेळाव्यास सर्वसामान्यांचा मिळणारा प्रतिसाद व शासकीय योजनांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा प्रशासनापर्यंत व्यवस्थीत पोहचल्या जात आहेत. जवळपास सर्वच योजना या ऑनलाईन पद्धतीने आता राबविल्या जात आहेत. यामुळे पारदर्शकतेसह दिलेल्या कालावधीत सदर अर्ज निकाली काढण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

लोहा तालुक्यात गत 3 महिन्यात एकुण 176 लाभार्थ्यांना तात्काळ लाभ या योजनेतून पोहचविला गेला आहे. यात श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना, इंदिरा योजना यासाठी जिल्ह्यात एकुण 140 प्रस्ताव आले होते. यापैकी 100 लोकांना लाभ पोहचला आहे. इतर प्रकरणाबाबत लवकरच निर्णय दिला जात आहे. केंद्र शासन राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेसाठी 36 प्रस्ताव प्राप्त झाले असून यापैकी 28 प्रस्तावांना लाभ देण्यास सुरू झाला असून उर्वरीत प्रकरणातील त्रुट्या पूर्ण करून त्यांनाही विकासाच्या प्रवाहात सामावून घेत जात असल्याचे माहिती तहसिलदार डॉ. व्यंकटेश मुंडे यांनी दिली.

Previous articleत्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा बसविण्यात यावा —
Next articleशरद पवार हे गद्दारीचे आदी पुरुष, आज त्यांचा…; भाजपा खासदार अनिल बोलण्याचा खोचक टोला.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here