Home नांदेड लेंडी धरणग्रस्तांच्या लढ्याला व मागण्यांना लवकरच बळ मिळेल-मेधाताई पाटकर.

लेंडी धरणग्रस्तांच्या लढ्याला व मागण्यांना लवकरच बळ मिळेल-मेधाताई पाटकर.

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20231229_075953.jpg

लेंडी धरणग्रस्तांच्या लढ्याला व मागण्यांना लवकरच बळ मिळेल-मेधाताई पाटकर.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

मागील 37 वर्षांपासून प्रलंबित असलेला बहुचर्चित असा लेंडी प्रकल्पाच्या धरणग्रस्तांचे मागील अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष चालू आहे. शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर व लेंडी संघर्ष समितीच्या माध्यमातून सध्या चालू असलेल्या साखळी उपोषणाला माजी खासदार डॉ. व्यंकटेशजी काब्दे साहेब, भाऊराव मोरे, सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी भेट दिली, सक्रिय पाठिंबा दिला व धरणग्रस्तांच्या मागणीवरून नर्मदा बचाव आंदोलनाच्या ज्येष्ठ नेत्या मेधाताई पाटकर यांना धरणावर आणून धरणग्रस्तांच्या चालू असलेल्या संघर्षाला खूप मोठे पाठबळ मिळवून दिले.
मेधाताई पाटकर यांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठी भव्य दिव्य सभा ही झाली. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने व भेटीमुळे शासन व प्रशासन पातळीवर या कार्याला नक्कीच गती येईल हे मात्र नक्की…. मेधाताई त्यांच्या उपस्थितीचा सर्वच प्रसार माध्यमे, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाने विशेष दखल घेतली. सर्वच राजकीय पक्ष यांनी मतभेद बाजूला सारून व स्थानिक लोकप्रतिनिधींनी श्रेयाचे राजकारण थोडेसे बाजूला ठेऊन, थोड मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले तर नक्कीच हा प्रश्न लवकरात लवकर सुटू शकेल असा आशावाद कैलास येसगे कावळगावकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here