Home गडचिरोली पुलखल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

पुलखल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

129

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0058.jpg

पुलखल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क ) : तालुक्यातील पुलखल येथे मोठ्या उत्साहाने भर पावसातही राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच सावित्री गेडाम यांचे हस्ते ग्रामपंचायत कार्यालय तर शाळा समिती अध्यक्ष श्रीकांत सिडाम यांचे हस्ते उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपसरपंच रुमनबाई ठाकरे, ग्रा.प.सदस्य तुकाराम गेडाम, खुशाब ठाकरे, प्रविण कन्नाके, कविता ठाकरे, जिजाबाई आलाम, सचिव एन.डी.मोटघरे, तंटामुक्ती अध्यक्ष गिरिधर ठाकरे, ग्रामस्थ भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, शामराव चापले, आनंदराव ठाकरे, दिनकर ठाकरे, विनायक रोळे, टिकाराम राऊत, हिरामण मरस्कोल्हे, शामराव ठाकरे, तुकाराम रेचनकर, रेखा सेडमाके प्रामुख्याने उपस्थित होते.

ध्वजारोहनानंतर शाळेच्या शिक्षिका कविता बावणे, पुनम सेहगल, प्रविण घरत, संध्या नंगरे, अंगणवाडी सेविका शोभा ठाकरे यांच्या पुढाकाराने गावातून विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी प्रभात फेरी काढून स्वातंत्र्यदिन चिरायु हो! चे नारे दिले.

दरम्यान १३ तारखेपासूनच गावातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजगार सेवक विनोद ठाकरे, ग्रा.प.कर्मचारी सुधीर झरकर, कविता मुळे, हेमलता सेडमाके, अंगणवाडी मदतनीस रंजना ठाकरे, युवक कार्यकर्ते प्रशांत कोटगले, अनिकेत गेडाम, सुरज जराते, विशाखा रोहणकर, साक्षी जेट्टीवार, लक्ष्मी कोटगले, जिन्नत गोरडवार, स्नेहल जेट्टीवार, यामीनी सेडमाके यांनी सहकार्य केले.

Previous articleआश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Next articleनवी धांद्रीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा;ध्वजारोहण पगारेंच्या हस्ते संपन्न!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.