• Home
  • 🛑 राज्यातील पुढील भागात ४८ तास मुसळधार पाऊस….! हवामान खात्याचा अंदाज 🛑

🛑 राज्यातील पुढील भागात ४८ तास मुसळधार पाऊस….! हवामान खात्याचा अंदाज 🛑

🛑 राज्यातील पुढील भागात ४८ तास मुसळधार पाऊस….! हवामान खात्याचा अंदाज 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕राज्यातील मान्सूनच्या पावसानं गेल्या काही दिवस दडी मारल्याचं पहायला मिळालं. आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असून पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे पुढील दोन दिवस चांगला जोर राहील, असंही हवामान विभागानं सांगितलं आहे. यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे बराच दिलासा मिळणार आहे.

कोकण किनारपट्टीवर पावसानं काही दिवस चांगलीच दडी मारली होती. मात्र आता पाऊस कोकणात सक्रिय होत असून पालघर व रत्नागिरीमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्यानं कोकणवासीयांना वातावरणात पुन्हा एकदा गारवा अनुभवायला मिळणार आहे.

उत्तर भारतातही पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार तर शुक्रवारी रिमझिम पावसाची शक्यता असल्याचं ही शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतीतील कामांसाठी पावसाची आतुरतेनं वाट पाहणार्या शेतकर्यांनाही दिलासा मिळणार आहे…….⭕

anews Banner

Leave A Comment