Home नाशिक कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालय निंबायतीचा माजी विद्यार्थी ठरला एमपीएससी MPSC टॉपर…

कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालय निंबायतीचा माजी विद्यार्थी ठरला एमपीएससी MPSC टॉपर…

282
0

आशाताई बच्छाव

IMG-20220725-WA0047.jpg

कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालय निंबायतीचा माजी विद्यार्थी ठरला एमपीएससी MPSC टॉपर…     निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालय निंबायती चा माजी विद्यार्थी दत्तू लक्ष्मण नाईकवाडे (दर्हेल) MPSC च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन कर सहाय्यक (Tax Assistant)पदी विराजमान झाला.

खडतर परिस्थितीत प्रचंड अभ्यास व जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

त्याच्या यशात आई-वडील,त्याचे सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्याचा प्रयत्न यांचा समावेश आहे.

आज कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालय निंबायती येथे त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद नाशिक चे माजी अध्यक्ष श्री.मधुकर बापू हिरे यांनी आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. आकाश(दादा)हिरे यांनीही दत्तूचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी दत्तू लक्ष्मण नाईकवाडे, वडील लक्ष्मण नाईकवाडे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनिल परशराम हिरे ,शिक्षक श्री.एन.के.आहिरे सर.
श्री.मंन्सुरी सर, श्री.सुरेश गोविंदराव हिरे सर, श्री.कदम सर,श्री.सुर्यवंशी सर, श्री.विजय हिरे सर, श्री.बिडगर सर , श्री.निलेश हिरे सर, श्री.समाधान अहिरे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.महावीर सर , श्री.अनिल शेवाळे, श्री.वाल्मिक बाविस्कर विद्यार्थी पालक श्री.प्रमोद काळू शेवाळे उपस्थित होते.

यावेळेस दत्तू नाईकवाडे यांनी १० वी वर्गात मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी खुप अभ्यास करून शाळेचे ,आई-वडीलांचे गावाचे नाव मोठे करावे असे आवाहन केले.

Previous articleदोन वर्षिय चिमुकलीवर अत्याचार करुन आरोपी फरार।
Next articleग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने शेतकरी त्रस्त तलाठी दोन तीन गावे असल्याचे कारण सांगून वेळ मारून नेत आहेत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here