Home बुलढाणा ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने शेतकरी त्रस्त तलाठी दोन...

ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने शेतकरी त्रस्त तलाठी दोन तीन गावे असल्याचे कारण सांगून वेळ मारून नेत आहेत

88
0

आशाताई बच्छाव

IMG-20220725-WA0044.jpg

ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने शेतकरी त्रस्त
तलाठी दोन तीन गावे असल्याचे कारण सांगून वेळ मारून नेत आहेत

बुलढाणा,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
वानखेड सर्कल सह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे मुख्यालय राहत नाही यावर्षी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ तर काही भागांमध्ये अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाले वाणी या कीटकामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे तालुक्यातील काही परिसर खारपारपट्ट्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक च्या माहिती तसेच शासन स्तरावर कुठल्याही उपाययोजना असल्यास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे परंतु याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे शेतकरी विद्यार्थी गावातील नागरिक यांच्यासाठी प्रत्येक गावासाठी असणारेअधिकारी गावाचा कणा आहे शेतीविषयक माहिती जर लागली तर कृषी सहाय्यक आणि महसूल व शेती विषयक तलाठी ग्रामपंचायत येथील कामे हे सर्व ग्रामसेवकांकडेच आहे त्यामुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी हे कर्मचारी आपापल्या सोयीच्या ठिकाणी राहत असल्यामुळे याचा फटका गावावर शेतकऱ्यांवर विद्यार्थ्यांवर पडत आहे काही तलाठ्यांचे कार्यालय कोतवाला च सांभाळतात हप्त्यातून एक-दोन वेळच देतात हजेरी अशी अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असताना वरिष्ठ याकडे का लक्ष देत नाही असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे मुख्यालय ई राहत नसल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत सरकारी योजना गतिमान पद्धतीने राबवण्यासाठी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी मुख्याल इ राहायला पाहिजे शेतकरी सन्मान योजना ई पिक पाहणी विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्रे शेतकऱ्यांना मार्गदर्शन ग्रामपंचायत स्तरावर गावातील स्वच्छता घरकुलाचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांना लागणारे दाखले असतील हे सर्व ग्रामसेवकांकडे आहे यासाठी ग्रामसेवकाची वाट पाहत बसवी लागते या सर्व बाबी शासनाने आणलेल्या योजना या गावांमध्ये कशातरीना राबवाव्या त्याकरिता इतरही आपत्कालीन माहिती संकलित करण्यासाठी आणि त्या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे महत्वाची भूमिका मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक हे बजावत असतात परंतु बऱ्याचश्या गावांमध्ये मुख्यालय राहत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे
ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी मुख्यालय राहणे बंधनकारक असताना मुख्यालय राहत नाहीत त्यामुळे सर्व सामान्य जनतेची हेळसांड होत आहे याकडे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब यांनी लक्ष देण्याची गरज
देशाच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्या पत्रकारिता क्षेत्राकडे मोठ्या आशेने बघितल्या जाते त्या पत्रकार चा फोन वानखेड भाग 2 चे तलाठी प व्हि कस्तूरे हे फोन केला तर ऊचलत नाहीत शेतकर्याच्या खूप अडचनि असतात

अधिकारी गावामध्ये मुख्यालय राहत नसल्याने विद्यार्थ्यांसाठी शालेय दाखले तसेच सातबारे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक गावामध्ये राहत नसल्याने त्रस्त झाले आहे
स्वप्निल देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here