Home बुलढाणा चिंताजनक :- संग्रामपुर परिसरात भुरटे व बोगस पत्रकारांचा बाटलीत उतरल्यावर बेवडेबाज अधिकाऱ्यांची...

चिंताजनक :- संग्रामपुर परिसरात भुरटे व बोगस पत्रकारांचा बाटलीत उतरल्यावर बेवडेबाज अधिकाऱ्यांची पाठराखण करताना …?

97
0

आशाताई बच्छाव

IMG-20220725-WA0042.jpg

चिंताजनक :- संग्रामपुर
परिसरात भुरटे व बोगस पत्रकारांचा बाटलीत उतरल्यावर बेवडेबाज अधिकाऱ्यांची पाठराखण करताना …?
स्वप्निल देशमुख सह ज्ञानेश्वर दांदळे पाटील
देशाच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्या पत्रकारिता क्षेत्राकडे मोठ्या आशेने बघितल्या जाते त्या पत्रकारितेत भुरटे।बोगस स्वयंघोषित पत्रकारांचा भरणा होत असल्याने पत्रकारिता धोक्यात आली असल्याचा चिंताजनक प्रकार संग्रामपुर तालुक्यात सध्या बघावयास मिळत असून ज्याना पत्रकारितेची एबीसीडी माहीत नाही अशा भुरटे व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट संग्रामपुर तालुक्यात चर्चेचा विषय बनत चालला आहे.
संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल दुर्गम भाग असून काही संधीसाधू बोगस पत्रकार पैशाची मागणी करून जणू यांना पैसे कमावण्याचा राजमार्गमिळाला की काय ? असाप्रश्न निर्माण होत असून अशा भुरटे व बोगस पत्रकारांचा वेळीच बंदोबस्त कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.या बोगस स्वयंमघोशित पत्रकारांचा सुळसुळाट खूपच मोठ्या प्रमाणात वाढला होता. ज्याप्रमाणे पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या उगवतात, बोगस पत्रकार पुन्हा एकदा उगवले आहेत. बोगस पत्रकार हे यू ट्यूब वर स्वतःचा व्हिडिओ तयार करून सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या व शासनाची फसवणूक करणाऱ्या अशा भिवडीबात अधिकाऱ्यांचे दलाल बनून त्या अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याकरिता जनते समोर खरी सत्यता लपवून बाटलीत उतरल्यानंतर त्यांच्याकडे जणू काही दैवी शक्तीच आहे असे बोलून सामान्य नागरिकांना न्याय देण्याकरता सत्य लिखाण करणाऱ्या पत्रकारांना हे भामटे सल्ला देतात की विचार करून अधिकाऱ्यांविरुद्ध बातमी लावत जा परंतु त्या हुशार रावांसाठी जनतेचा प्रश्न आहे पत्रकार म्हणून स्वतःचा झेंडा मिरवून खिसा गरम करणाऱ्या पेक्षा खरी आणि वस्तुस्थिती असलेली अधिकाऱ्यांविरुद्धची बातमी लावणारच खरा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटल्या जाईल. त्यामुळे आता अधिकाऱ्यांजवळून चिरीमिरी करून त्यांची बाजू मांडणाऱ्यांनो सावध राहा जनतेला तुम्ही काय आहात हे बऱ्यापैकी माहित आहे. आणि त्या कामसुकार व बेवडेबाज अधिकाऱ्यांन विरुद्ध न बोलता त्याच्या हिताचे बोलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात येत असल्याची चर्चा आहे. आणि एकीकडे मात्र यू ट्यूब चॅनेलच्या क्षेत्रात नव्याने आलेले काही पत्रकार प्रलोभनाशिवाय काम करतात अशा मंडळीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच मर्यादित आहे. याशिवाय संकेतस्थळावर सामाजिक हिताच्या विषयांवर लिखाण करणारे आणि त्याचा सामाजिक हितासाठी प्रसार करणारेही आहेत. मात्र कोणत्याही वृत्तपत्रामध्ये काम न करणारे व केवळ संकेतस्थळांवर ‘लुटीचे अर्थशास्त्र’ राबविणारे बोगस पत्रकारही तयार झाले आहेत. वेगवेगळ्या संकेतस्थळ आणि ब्लॉगवर लिखाण करून सामान्य नागरिक, आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर आपला वचक राहावा म्हणून या बोगस पत्रकारांचा त्रास वाढला असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या आहेत. अशा मंडळींचा अक्षरशः वैताग आल्याचे काही नागरिक, अधिकारी, राजकारणी सांगत आहेत. तर खरोखरच अन्याय विरुद्ध लढा देत बातमी प्रकाशित करणाऱ्या एकनिष्ठ पत्रकारांच्या विरुद्ध अशा मंडळींकडून काही जणांशी संधान साधून एखाद्याची ठरवून बदनामी करण्यासाठी “सुपारीबाज’ पत्रकारिताही उदयास आणली जात असून ती समाजासाठी मारक असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या भोंदू पत्रकारांनो आताही सावध होऊन आपले अवैध आणि “कळलावे” (तुम्ही नारद नाही तर मर्द आहात हे लक्षात घ्या ) धंदे बंद करा व पत्रकारितेच्या नावावर अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून त्रास देने त्वरित थांबवा अन्यथा तुमचा जाहीररीत्या भांडाफोड करण्यात येईल..

ही धमकी नाही,इशारा आहे. कुणाला धमकी देत नाही तर सावधगिरीचा इशारा देत असतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही. समझदार को इशारा काफी होता है..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here