Home नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात.             

नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात.             

195

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0017.jpg

नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात.                                                    जिल्हा ब्युरो चीफ :- सागर (गणेश) कांदळकर   गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी संकटात आत्ता परिसरातील मिरची ,पपई , मूग, कपाशी पिकांची झाडे अती पावसाने पिवळी पडून कोमजत आहे. तर येथे मिरची पिकांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणतात ना कोणती ही गोष्ट ही गरजेपेक्षा अधिक मिळाली की ती नुकसान करून जाते तसा प्रकार होत आहे….

पावसाने दडी दिल्या नंतर पाऊस कधी पडेल म्हणून चिंतेत असलेला बळीराजा सततच्या पावसाने संकटात सापडला आहे. सततच्या पावसाने पिके बसण्यास सुरवात झाली असून यात मिरची, कपाशी पिकांची झाडे पिवळी पडत आहे.

तर नंदुरबार , शाहदा परिसरात मिरची ,सोयाबीन,कपाशी पिकांना अक्षरशः पीक सोडून देण्याची वेळ आली यावर्षी चांगल्या प्रमाणात असून उत्पन्न ही चांगले होईल अशी आशा आहे, मात्र पावसाने विश्रांती घेतली नाही तर हातात येणारे पीक डोळ्यासमोर नुकसान होईल हे तितकेच खरें.

कृषी विभागाने (Krushi Department) परिसरातील पीक पाहणी करावी, झालेल्या नुकसानी बाबत शासन दरबारी माहिती कळवावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे मिरची, पपई ,सोयाबीन,कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
कपाशी पिकाची झाडे पिवळी पडली असून अतिरिक्त फवारणी करून ही झाड वाचेल की नाही सांगता येत नाही.

Previous articleनांदेडच्या लामकानी गावात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Next articleवरवट बकाल ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून आजी-माजी सैनिकांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.