Home बुलढाणा संग्रामपूर तहसील अखेर कुंभकर्णी झोपेतून जागे, वाळूचे 407 टिप्पर जप्त वाळू तस्करांचे...

संग्रामपूर तहसील अखेर कुंभकर्णी झोपेतून जागे, वाळूचे 407 टिप्पर जप्त वाळू तस्करांचे धाबे दणाणले

37
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220413-WA0121.jpg

संग्रामपूर तहसील अखेर कुंभकर्णी झोपेतून जागे, वाळूचे 407 टिप्पर जप्त वाळू तस्करांचे धाबे दणाणले
ब्युरो चीफ स्वप्नील देशमुख बुलढाणा सह संग्रामपुर ता.वि. प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपूर :-तालुक्यातील काटेल कोलद वान नदी पात्रातून अवैधरित्या उत्खनन करीत असलेले 407 टिप्पर ही रूढी रेती घेऊन जात असतानी काटेल गावात महसूल विभागाच्या पथकांनी जप्त करून तासगाव पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले असून ही कार्यवाही दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी सकाळी सहा वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान करण्यात आली ही कार्यवाही वि.तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख बावनबीर मंडल अधिकारी श्री रवींद्र बोराखडे, तलाठी सूदेवाड व तलाठी शेख वसीम यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने रेती माफियांच्या लोकेशन ग्रुपला चकमा देत अखेर रेती माफियांच्या मुसक्या आवरण्यात मंडळ अधिकारी बोराखडे यांच्या पथकाला यश आले असून विनापरवाना अवैद्य रोळी रेती घेऊन जाणारे टिप्पर (407) वाहन क्रमांक एम एच 04 जी आर 0475 हे वाहन काटेल गावात थांबवून वाहन चालकास रेती परवाना विचारण्यात आला असता रॉयल्टी आढळून आली नाही. सदर वाहनाचे मालक कोलद यथील प्रकाश अवचार (देशमुख) हे असून वाहनाचा पंचनामा घटनास्थळी काटेल येथे करून रूढी व रेतीने भरलेले सदर वाहन हे पोस्ट तामगाव येथे लावण्यात आले व पुढील दंडनीय कारवाईसाठी तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे प्रकरण सादर करण्यात आले असल्याची माहिती ही पथक प्रमुख मंडळ अधिकारी बोराखडे यांनी दिली अखेर कुंभकर्णी झोपेतून जाग आलेल्या महसुली विभागामुळे नदीपात्रातील राजरोसपणे उत्खनन करणाऱ्या रेती माफियां मध्ये एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येते मात्र अवैध गौण खनिज उत्खनन विरोधात ग्राम दक्षता समिती ही दुर्लक्ष करीत असल्याचं सुद्धा दिसून येते तरी वरील पथकाने केलेल्या कारवाई प्रमाणेच वानखेड व रिंगणवाडी वान नदीपात्रातील अवैद्य वाळू तस्करी येथील संबंधित मंडल अधिकारी व तलाठी हे कारवाई करतील का? याकडे संग्रामपूर चे दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विद्यमान तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी लक्ष घातल्यास वानखेड रिगणवाडी येथील नदीपात्रात मोठमोठे खड्डे करून वर्षानुवर्ष संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने चालू असलेल्या अवैद्य उत्खननाला आळा बसेल. अशी मागणी वानखेड शिवारातील शेतकरी सुद्धा करीत आहेत असे झाल्यास पर्यावरण प्रेमी मध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण होईल .

Previous article.गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्मरणार्थ गडगा येथे पाणपोई सुरु.
Next articleसंग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर यांच्याविरुद्ध न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी मागीतली परवानगी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here