Home बुलढाणा संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर यांच्याविरुद्ध न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी मागीतली परवानगी

संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर यांच्याविरुद्ध न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी मागीतली परवानगी

50
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220411-WA0101.jpg

संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर यांच्याविरुद्ध न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी मागीतली परवानगी
बुलढाणा (बिरो चिप स्वप्नील देशमुख सह
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपुर तालुका विशेष प्रतिनिधी) -संग्रामपूर तालुक्यात दिसून येते महसूल विभाग अधिकाऱ्याची हुकूमशाही संग्रामपूर तहसील चे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिनांक 16मार्च2022 रोजी तहसील कार्यालयात तलाठी तांबट यांची तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांन समोर अर्वाच्च भाषेत बोलत काही तक्रारदारांना उद्देशून सिद्धेश्वर वरणगावकर यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रताप केला त्या कृत्यांचा व्हिडिओ विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला
तसेच वि.उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली तरीसुद्धा आजवर कुठलीही कार्यवाही तहसीलदार यांच्यावर झालेली दिसून येत नाही. म्हणून अखेर तक्रारदार यांनी दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निवेदन दिले असून दिनांक 16मार्च 22 रोजी तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार वरणगावकर यांनी तक्रारदार व इतरांना उद्देशून अत्यंत अर्वाच्च व अश्लील शिवीगाळ केली तसेच त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या तरतुदीचे देखिल उल्लंघन केले व भादवी चे विविध कलमांचे देखील उल्लंघन केले तरीसुद्धा आजवर वरिष्ठांनी काहीच दखल घेतली नाही तसेच तहसीलदार यांच्या गैरवर्तणूकीचा व्हिडिओ बातम्या वृत्त विविध प्रसार माध्यमातून प्रकाशित झाले हे सर्व माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय निवासी जिल्हाधिकारी साहेब व अपर जिल्हाधिकारी गोगटे साहेब यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमानुसार पाठविण्यात आल्या त्या बातम्या व्हाट्सअप द्वारे पाठविण्यात आले मात्र एवढ्या सर्व तक्रारी होऊन देखील व विविध प्रसार माध्यमात प्रकाशित होऊन देखील अशाप्रकारे वरिष्ठ अधिकारी डोळे असून आंधळे असल्याचे सोंग केल्याचे दिसत आहे. म्हणून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नसून उलट तक्रारदार यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार व वृत्त प्रकाशित केल्यामुळे चिडलेले तहसीलदार हे तिराइत मार्फत तक्रारदार यांना 353 सारख्या खोट्या गुन्ह्यात अटकविण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे अशा मुजोर व आपण जनतेचे सेवक असल्याचा विसर पडलेल्या तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यावर न्यायालया मार्फत कार्यवाही करून त्यांना शिक्षा देण्याकरिता सीआर पी सी चे कलम 197 प्रमाणे परवानगी मिळण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्याकडे दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी तक्रारदारांनी अर्ज केला आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या मुजोर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यावर होणाऱ्या कार्यवाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.

Previous articleसंग्रामपूर तहसील अखेर कुंभकर्णी झोपेतून जागे, वाळूचे 407 टिप्पर जप्त वाळू तस्करांचे धाबे दणाणले
Next articleखामगाव फाटा शाळेत विद्यार्थ्याचा पुर्वतयारी मेळावा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here