Home मुंबई समाजसेवक मांगीलाल पुरोहित यांनी ३ एकर जमीन केली दान

समाजसेवक मांगीलाल पुरोहित यांनी ३ एकर जमीन केली दान

30
0

आशाताई बच्छाव

1000266382.jpg

समाजसेवक मांगीलाल पुरोहित यांनी ३ एकर जमीन केली दान

मुंबई.:-युवा मराठा प्रतिनिधी विजय पवार. समाजामध्ये दानधर्म फक्त भाषणातून, पुस्तकातून शिल्लक राहिला असल्याचे आढळून येते. जिथे वडिलोपार्जितच्या जमिनीसाठी खून,वाद होत असतात अशाच युगामध्ये दादर येथील कबुतरखान्याजवळ वात्सव्य करणारे पंडीत मांगीलाल पुरोहित यांनी दानधर्माचा आदर्श घालून दिला.
राजस्थान येतील बाली जिल्हातील बारवा गावातील गौसेवार्थ लक्ष्मीनारायण सेवा समितीचा गायींचा तबेला चालवणाऱ्यानी पाण्याच्या कमतरतेमुळे श्री. मांगीलाल पुरोहित यांना थोडी जमीन देण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी तेथील परिस्थिती पाहून आपल्या मालकीची ३ एकर जमीन या तबेला सेवा समितीला दान म्हणून दिली. एवढेच नसून तबेलाच्या बांधकामासाठी ११ हजार रुपये मदत सुद्धा केली. श्री. मांगीलाल पुरोहितांनी दाखवल्या औदार्याचे सगळीकडून कौतुक होते आहे. त्यांच्या समाजकार्याचा सन्मान म्हणून दादरचे स्थानिक आमदार श्री. कालिदास कोळंबकर व भाजप जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कांबळे यांनी त्यांचा नागरी सत्कार घेऊन त्यांना सन्मानित केले .

Previous articleआनंद राज आंबेडकरांनी भूमिका केली पोस्ट आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा निवडणूक लढवणार.
Next articleश्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमन पदी मधुसूदन मोहिते-पाटील यांची फेरनिवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here