Home अमरावती श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमन पदी मधुसूदन मोहिते-पाटील...

श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमन पदी मधुसूदन मोहिते-पाटील यांची फेरनिवड.

30
0

आशाताई बच्छाव

1000266384.jpg

श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमन पदी मधुसूदन मोहिते-पाटील यांची फेरनिवड.
__________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चे अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आ. यशोमती ठाकूर तर चेअरमन पदी मधुसूदन मोहिते-पाटील यांची बहुमताने फेर निवड झाली. संस्थेच्या नूतन कार्यकारणी निवडसाठी भिवाळी-वज्रेश्वरी, जि. ठाणे येथे झालेल्या मिशनची सर्वसाधारण सभा पार पडली. मिशनची नूतन कार्यकारणीत उपाध्यक्ष उत्तमराव देशमुख (अमरावती), सचिव विश्वनाथ नाचवणे (पालघर), सचिव घोंगटे(यवतमाळ), खजिनदार ज्ञानदेव महाकाल (अमरावती), अशोक पाटील (अहमदनगर) तर सदस्य आश्विन भाई मेहता (मुंबई), रुक्मिणी सातपुते (सोलापूर), चंद्रकांत माने (सातारा), अनिल आवटे (ठाणे), सुनील बाविस्कर (नाशिक), चंद्रकला पाचंगे (सोलापूर), अजित टेमकर (अहमदनगर), ललित उजेडे (चंद्रपूर) यांचा समावेश आहे. यापूर्वी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, अच्युतराव देशमुख, यशवंतराव माने, विश्वनाथ वाघ महाराज यांनी संस्थेचे अध्यक्ष पदाचे काम पाहिले आहे. संत गाडगेबाबांनी १९५२ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विशेषतः आदिवासी, भटक्या विमुक्त्यासाठी आश्रम शाळा, वस्तीगृह, वृद्धाश्रम, बालकाश्रम, धर्मशाळा, अन्नदान सदावर्त गौरक्षण इत्यादी उपक्रम राज्यभर विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. आदिवासी, भटक्या विमुक्त साठी आश्रम शाळा आदी उपक्रम संस्थेमार्फत राबवत आहे.

Previous articleसमाजसेवक मांगीलाल पुरोहित यांनी ३ एकर जमीन केली दान
Next articleनामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत महायुतीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here