Home गडचिरोली सावली तालुक्यामध्ये व्याहाड बुज येथे विविध घडलेल्या घटनेच्या संदर्भात आर्थिक मदत देऊन...

सावली तालुक्यामध्ये व्याहाड बुज येथे विविध घडलेल्या घटनेच्या संदर्भात आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन खा‌.अशोकजी नेते‌‌.

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0020.jpg

सावली तालुक्यामध्ये व्याहाड बुज येथे विविध घडलेल्या घटनेच्या संदर्भात आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन खा‌.अशोकजी नेते‌‌.

या संदर्भात दखल घेत अधिकाऱ्यांना दिले निर्देश…….

सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):– व्याहाड बुज.येथे आज दिनांक ३० ऑगस्ट २०२२ ला हरितालिका तृतीया (गौरी पुजन) या दिनाचे औचित्य साधून सावली तालुक्यामध्ये व्याहाड बुज.येथे विविध घडलेल्या घटनेच्या संदर्भात आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन खा.अशोकजी नेते.

खा.अशोकजी नेते यांनी सावली दौऱ्या प्रसंगी आले असता व्याहाड बूज येथे विविध ठिकाणी घडलेल्या घटनेच्या संबंधित माहिती तालुकाध्यक्ष अविनाश पाल व दिवाकर गेडाम ग्रामपंचायत सदस्य व्याहाड बुज.यांनी माहिती दिली असता यांची दखल घेत या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी याबाबतचे गांभीर्य लक्षात घेत व्याहाड बुज येथील मजुरी करणारा काही दिवसापूर्वी स्वर्गीय दशरथ गेडाम यांचा गिट्टी खदाणमध्ये मजुरीचे काम करीत असतांना अपघाती निधन झालं हि बातमी कळल्यानंतर खासदार साहेब यांनी त्यांच्या पाश्चात्त्य त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सांत्वन केलं.

तसेच पोळ्याच्या दिवशी दोन दिवसाच्या अगोदर रानटी डुकराने श्री.पुरुषोत्तम सखाराम जेंगटे या गुराखीला जखमी करून सोडले. यासंदर्भात खासदार अशोकजी नेते यांना माहिती कळताच त्या गुराखीच्या घरी जाऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली.तसेच त्यांना आर्थिक मदत देऊन सांत्वन केल.त्यांच्या तब्येतीबाबत सीएस डॉ.अनिल रूडे साहेब यांना दूरध्वनी वरून या संदर्भाची दखल घेत त्यांना सूचना केल्या.आणि वनविभागाचे अधिकारी यांना सुद्धा चौकशी करून आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

यावेळी शामरावजी गेडाम हे सुद्धा जखमी इसम असल्याचे कळताच यांनासुद्धा आर्थिक मदत देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून विचारपूस करण्यात आली. तसेच सुनिता कवाडकर यांचे घर पडल्याची माहिती मिळताच व त्यांना कोणीच आधार नसल्याचे कळताच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच सांत्वन करण्यात आले.

याप्रसंगी खा.अशोकजी नेते. तालुकाध्यक्ष तथा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,दिवाकर गेडाम ग्रामपंचायत सदस्य,डॉ.तोडेवार साहेब,भाजपा युवा नेते दिवाकर म्याकलवार,भाजपा ज्येष्ठ नेते सुरेशजी सुत्रपवार,सुधाकर म्याकलवार,पत्रुजी गेडाम,रविंद्र निकेसर,रमेश साहारे, माजी.तं.मु.अध्यक्ष ज्ञानेश्वर निकोडे, तंटा मु.अध्यक्ष भास्करजी शेंडे, दिवाकर सातपैसे,,माणिक वासेकर,मुखरू बुरले, राजू गेडाम,रामभाऊ गेडाम,मारोती शेरकी,जगदिश हुड,किसन ठाकरे,देवानंद वासेकर, गुरुदास वासेकर,सुनिल भानोसे,राजु मेश्राम, संतोष मेश्राम, सुधीर वासेकर,दीपक वासेकर,तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleगणेशोत्‍सव देखावा सजावट स्‍पर्धा 2022 माझा गणेशोत्सव माझा मताधिकार
Next articleनगरपरिषद आमगांव येथे आढावा बैठक.खा.अशोकजी नेते सविस्तर विकास करण्यासाठी आराखडा तयार करणे आवश्यक…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here