Home कोकण प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात टूर , रत्नागिरी विभाग

प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात टूर , रत्नागिरी विभाग

139
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात टूर , रत्नागिरी विभाग

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य परिवहन रत्नागिरी विभागाने नाताळच्या, आणि शनिवार-रविवारला जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात टूर पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार काही मार्गांवर एसटी. बस सेवा देण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणी राहण्याचा माफक खर्च मात्र प्रवाशांनी करायचा आहे.

१)रत्नागिरी ते कोल्हापूर दर्शन- या मार्गावर मुक्कामी फेरी असेल. या फेरीची बस रत्नागिरी येथून सकाळी साडेसात वाजता सुटणार आहे. ती बस कोल्हापूर, ज्योतिबा, पन्हाळा येथे जाऊन आल्यावर महालक्ष्मी दर्शन घेऊन रंकाळा येथे मुक्कामी राहील.
रंकाळा येथे महालक्ष्मी धर्मसंस्था शाळा येथे राहण्याची व्यवस्था असेल. तेथून दुसऱ्या दिवशी न्यू पॅलेस, भवानी मंडप, कण्हेरी मठ, शालिनी पॅलेस, सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय या ठिकाणी जाऊन बस रत्नागिरीला परत येईल. धर्मशाळेचा माफक खर्च प्रवाशांनी करायचा असून, बस तिकिटाचा दर प्रतिप्रवासी ५७० रुपये आहे.
२) रत्नागिरी ते पंढरपूर –
अक्कलकोट-तुळजापूर दर्शन : या मार्गावरही मुक्कामी फेरी असेल. ही फेरी रत्नागिरी येथून सकाळी सात वाजता सुटणार आहे. ही बस तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट येथे जाऊन अक्कलकोट येथे रात्री वस्ती करून नंतर रत्नागिरीला परत येईल. धर्मशाळेत राहण्याचा खर्च प्रवाशांनी करायचा असून, बस तिकिटाचा दर प्रतिप्रवासी १२२५ रुपये आहे.
3) रत्नागिरी ते महाबळेश्वर- या फेरीची बस रत्नागिरी येथून सकाळी साडेसहाला सुटणार आहे. ही बस सातारामार्गे महाबळेश्वरला जाऊन खेड-चिपळूणमार्गे त्याच दिवशी रात्रीपर्यंत रत्नागिरीत परत येईल. बस तिकिटाचा दर प्रतिप्रवासी ६०० रुपये आहे.
किमान २५ प्रवाशांनी नोंदणी केल्यासच या सेवा दिल्या जाणार असून, त्यासाठी टू बाय टू बसेस दिल्या जाणार असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली आहे. या फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण रत्नागिरी आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानकातून करता येणार आहे. अधिक माहितीसाठी (०२३५२) २२२५५३ या क्रमांकावर संपर्क साधावा. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रत्नागिरीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी केले आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleनायगाव खैरगाव कुंटूर रोडवर बैलगाडी सोबतच्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार..
Next articleकोरोनाच्या साईड इफेक्टमुळे महिलेच्या शरीरात पस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here