• Home
  • कोरोनाच्या साईड इफेक्टमुळे महिलेच्या शरीरात पस

कोरोनाच्या साईड इफेक्टमुळे महिलेच्या शरीरात पस

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201224-WA0096.jpg

कोरोनाच्या साईड इफेक्टमुळे महिलेच्या शरीरात पस

औरंगाबाद शहरामधे आढळून आलेल्या एका महिला रुग्णामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनानंतर एका महिला रुग्णाच्या संपूर्ण शरीरात पस असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनानंतर उध्वलेल्या या दुष्परिणामाने डॉक्टरांना चकित केले असून भारतातील हा पहिलाच रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
वाळूज परिसरातील एका महिला कंबरेच्या दुखण्याने त्रस्त होती. अनेकवेळा उपचार घेतल्यानंतरही तिला फरक पडत नव्हता.
यामुळे डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला. यातून त्यांच्या संपूर्ण शरीरात पस झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली मात्र ती निगेटिव्ह आली. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाच्या अॅन्टीबॉडीज आढळून आल्या. यामुळे कोरोना होऊन गेला मात्र त्यांना कळले नाही. कोरोनानंतरच्या साईड इफेक्टमुळे हे उद्भवले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
२१ दिवसांच्या उपचारांनंतर ही महिला बरी झाली असून तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या महिलेवर ३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि आता ती निरोगी आहे. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार करण्यात आले. महिलेची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. श्रीकांत दहीभाते यांनी सांगितले. कोरोनाची लागण झाल्यानंतर असे साईड इफेक्ट असलेला भारतात हा पहिलाच तर जगभरातील हा सातवा रूग्ण असल्याचे सांगितले जात आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment