Home कृषिसंपदा कसमादे परिसरात पावसाअभावी सर्वत्र चिंतातूर वातावरण !सुसाट वा-यामुळे पेरण्या खोळंबल्या!

कसमादे परिसरात पावसाअभावी सर्वत्र चिंतातूर वातावरण !सुसाट वा-यामुळे पेरण्या खोळंबल्या!

56
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220620-212446_Google.jpg

कसमादे परिसरात पावसाअभावी सर्वत्र चिंतातूर वातावरण !सुसाट वा-यामुळे पेरण्या खोळंबल्या!
(आशाताई बच्छाव युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-मालेगांव तालुक्यासह संपूर्ण कसमादे पट्ट्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत दोन वर्षात चांगला पावसाळा झाला; मात्र यावर्षी आज पावसाळा सुरुवात होऊन पंधरा दिवसाचा कालावधी उलटूनही पावसाचा अद्याप थांगपता नसल्याने शेतकरी वर्ग चिंताक्रांत झाला आहे.सुरुवातीला अगदी अल्पसा पाऊ झाला तर काही ठिकाणी जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पाऊस येईल या भरवश्यावर पेरण्या केल्या मात्र सर्वत्र सुटलेल्या सुसाट हवेमुळे वातावरणात ढग जमा होऊन पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने आणि केलेली पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यापुढे आ वासून उभे ठाकले आहे.तर शेतकरी आकाशकडे टक लावून पावसाची केविलवाण्या व आशाळभूत नजरेने टक लावून पाहणी करीत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र बघावयास मिळत आहे.

Previous articleपुणेत युवा मराठा न्युज प्रतिनिधी प्रशांत नागणे यांच्या निवासस्थानी पितृदिन साजरा
Next articleबावनबीर येथे घरावर कोसळली कडकडाट वीज,घराचे नुकसान,जीवितहानी टळली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here