Home युवा मराठा विशेष मराठा समाजाला EWS चा लाभ, महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

मराठा समाजाला EWS चा लाभ, महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

170
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठा समाजाला EWS चा लाभ, महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

मुंबई : मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आलं आहे. एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरता ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
मराठा समाजासाठी हा खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणारआज  बैठक
Next articleनायगाव खैरगाव कुंटूर रोडवर बैलगाडी सोबतच्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here