Home रत्नागिरी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात औषधी वनस्पती, रानभाजी प्रदर्शन

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात औषधी वनस्पती, रानभाजी प्रदर्शन

176

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात औषधी वनस्पती, रानभाजी प्रदर्शन

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ)- येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे औषधी वनस्पती व रानभाज्या यांच्या प्रदर्शनाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय अभ्यासिका कक्ष येथे आयोजित करण्यात आले आहे. आहे. बुधवार दि.२४ ऑगस्ट रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. बुधवारपासून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी या प्रदर्शनास भेट देत आहेत. आज २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० ते ४.०० या वेळामध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. जास्तीत जास्त जणांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.