आशाताई बच्छाव
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी महिला शहराध्यक्षपदी सौ. शोनाली सुयोग आंबेरकर यांची नियुक्ती रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
रत्नागिरी-प्रभाग क्र. 3 मधील सक्रिय भाजपा कार्यकर्त्या सौ. शोनाली आंबेरकर (BE civil) यांची रत्नागिरी महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
भाजपा महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सौ. आंबेरकर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि पार्टीचे आभार व्यक्त करून दिलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देऊन शहर महिला मोर्चा अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असे मनोगत व्यक्त केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, युवामोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, महिला जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रुमडे, महिला जिल्हा सरचिटणीस शिल्पा मराठे, माजी नगरसेविका संपदा तळेकर, वर्षा ढेकणे आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.