Home उतर महाराष्ट्र दिपक अहिरे यांना विधानपरिषदेवर नेतृत्व करण्याची संधी द्या ! आदिवासी भील समाज...

दिपक अहिरे यांना विधानपरिषदेवर नेतृत्व करण्याची संधी द्या ! आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्था बागलाण यांची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानासाहेब पटोले यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी..

100
0

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0002.jpg

दिपक अहिरे यांना विधानपरिषदेवर नेतृत्व करण्याची संधी द्या ! आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्था बागलाण यांची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानासाहेब पटोले यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी..
ताहाराबाद:-(प्रतिनिधी)प्रविण पवार,युवा मराठा न्युज
शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष मा.दिपकदादा अहिरे यांनी गेल्या वीस वर्षांपासून आदिवासी समाजासाठी चळवळ उभी करून समाजाला जागृत करण्याचे महान कार्य करताना काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. उत्तर महाराष्ट्रात आदिवासी भील समाजाची लोकसंख्या तीस लाखांच्या घरात आहे.एवढा प्रचंड जनसमुदाय असुनही तसेच भील समाजाच्या राजकीय पोळी भाजणाऱ्यांनी आजपर्य॔त आदिवासी भील समाजाच्या न्याय,हक्क व अधिकारासाठी आवाज कुणी उठविलेला नाही त्यासाठी दिपक अहिरे यांच्या सारख्या सक्षम व निस्वार्थी समाजसेवकास विधानपरिषदेवर नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे मागणी करित त्यांना साकडे घातले आहे.

विद्यार्थी दशेपासुन अंगात चळवळ
समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्या करिता उभी केलेली आंदोलने, आदिवासी एकता परिषद ह्या चळवळींचे सुरुवातीचे धडाडीचे सदस्यत्व कार्यकर्ते अशी ओळख असलेले शिंदखेडा येथील भुमीपुत्र समाजसेवक दिपकदादा अहिरे यांच्या रूपाने सारा उत्तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी नेता म्हणून पाहिले जाते.आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कोणत्याही प्रकारची अभिलाषा न बाळगता निस्वार्थी, निःसंकोचपणे काम करत आहेत.त्या आधारावर अलिकडच्या काळात उपेक्षित वंचित समाजासाठी चळवळ उभी करायची मोहीम हाती घेतली त्यातून भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य ह्या संस्थेच्या माध्यमातून समाजाला खरे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

ह्या मंचच्या वतीने दिपक अहिरे यांनी सामाजिक मेळावे, शिबिरे, परिवर्तन सभा ,संमेलने घेऊन समाजाला जागृत करण्याचे काम केले आहे आणि करत आहेत.उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात फिरून भिल आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एका व्यासपीठावर धडपड सुरू झाली.म्हणुन मागील काही महिन्यांपूर्वी एक समाजाच्या हिम्मत व ताकदीवर भले मोठे पाऊल उचलले होते ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक भिल महासंमेलन आयोजित करून एक इतर संमेलनाला लाजवेल अशी ओळख निर्माण करून नवा इतिहास रचला न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करित संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने भिल समाज एकत्र आणण्याचा पराक्रम केला होता. अशा देखणा व दिमाखदार सोहळ्यात माजी आदिवासी मंत्री पद्माकर वळवी यांच्या सह महाराष्ट्रातील दिग्गज आदिवासी प्रवक्ते एका व्यासपीठावर आणून समाजप्रबोधन केले.शिवाय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर दिपकदादा अहिरे यांनी शिंदखेडा नगरपंचायत वर सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.आदिवासी भिल समाज हा सतत काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार आहे.

स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कामातून प्रभावित होऊन हा समाज आजसुद्धा काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिला आहे. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या ( 30,00,000/ तीस लाख ) आदिवासी भील समाजाला विधानपरिषदेवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे.हया आशेने आदिवासी सारा समाज दिपक अहिरे यांच्या रूपाने पाहत आहे. तसेच आदिवासी समाजाला विधानसभेत राज्यातील विविध भागात आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ जवळपास 25 असून सुद्धा आदिवासी संविधानिक अधिकारापासून वंचित राहिलेला आहे.उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास नाशिक,धुळे,नंदुरबार, जळगाव,अहमदनगर,बुलढाणा,तसेच औरंगाबाद आदी जिल्ह्यांचा विचार केल्यास जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात आदिवासी भिल समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.या जिल्ह्यातील अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे आदिवासी भिल समाज किंग मेकरच्या भुमिकेत आहे.

धुळे,नंदुरबार,दिंडोरी,रावेर,या लोकसभा मतदारसंघात देखील सर्वाधिक मतदान भिल समाजाचे आहेत.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, बागलाण , कळवण ,नांदगाव, देवळा चांदवड, येवला,तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर,जामनेर सह सर्वच मतदारसंघ,धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा ,शिरपूर, साक्री,धुळे ग्रामीण आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात आदिवासी भिल समाज मोठ्या प्रमाणावर आहे.

महाराष्ट्रातील एकुण आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात भिल समाजाची लोकसंख्या तीस लाखांच्या घरात आहे.उत्तर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते भिल समाजाच्या मतांवर आजपर्यंत राजकीय पोळी भाजून स्वतः चा स्वार्थ साधून गप्प बसून राहिले.पण कोणीही या उपेक्षित समाजाला न्याय, हक्क व अधिकारासाठी आवाज उठवला नाही. ज्याअर्थी केवळ 3% असणारे धनगर समाजाला विधानपरिषदेत जागा दिली जाते, त्याप्रमाणेच आमच्या भिल समाजालाही विधानपरिषदेवर दिपकदादा अहिरे यांच्या रूपाने जागा द्यावी त्यांचे कार्य समाजाप्रती अतिशय चांगले व निस्वार्थी आहे.उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात यांच्या कामाची पावती आहे.

अनेक ठिकाणी भिल समाज विकास मंचच्या शाखा सुरू आहेत.ह्या पुढे शिंदखेडा मतदारसंघासह उत्तर महाराष्ट्रात सर्वच विधानसभा क्षेत्रातील गावागावात शाखा ही मोहीम हाती घेतली आहे म्हणून काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिलेला दिपक दादा अहिरे यांना एक वेळा विधानपरिषदेवर नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा ह्या निमित्ताने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे केली आहे की आम्हा आदिवासी भिल समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विचारपूर्वक निर्णय घेऊन संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांना एक वेळा निश्चित संधी उपलब्ध करून देतील.भविष्यात दिपक अहिरे हे धगधगते निखारे विधानसभा मतदारसंघात आदिवासी भिल समाजाला जागृत करण्यासाठी नेतृत्व केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही कारण उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी भिल समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

Previous articleभारतीय जनता पार्टी रत्नागिरी महिला शहराध्यक्षपदी सौ. शोनाली सुयोग आंबेरकर यांची नियुक्ती
Next articleगोविंदा रे गोपाळा च्या गजरात चिमूर येथे दहीहंडी उत्सव जोमात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here