Home नाशिक नमन एज्युकेशन संचलित रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

नमन एज्युकेशन संचलित रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

136

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0001.jpg

नमन एज्युकेशन संचलित रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे युवा मराठा न्युज नेटवर्क
दिनांक 13 जुलै रोजी ‘नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेमध्ये ” गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम” उत्साहात संपन्न झाला.

आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ. सरिता बागुल मॅम, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी मॅम, यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष श्री. संजय बागुल सर तसेच उपाध्यक्षा सौ. सरिता बागुल मॅम यांनी सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: I गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः II ही प्रार्थना घेण्यात आली. सर्व शिक्षक वर्गांनी त्यांच्या गुरूंना म्हणजेच श्री. बागुल सर आणि सौ. बागुल मॅम यांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता मॅम यांना सुद्धा भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांना भेट म्हणून ग्रीटिंग कार्ड तयार करून आणले होते. मुलांनी तयार करून आणलेले ग्रीटिंग कार्ड सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष बागुल सर तसेच उपाध्यक्षा बागुल मॅम यांना कार्ड देऊन आशीर्वाद घेण्यात आले. प्रिन्सिपल मॅडम तसेच वर्गशिक्षक यांना सुद्धा कार्ड देऊन आशीर्वाद घेण्यात आले. शाळेतर्फे मुलांचे कौतुक म्हणून मुलांना चॉकलेट देण्यात आले अशाप्रकारे आज हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यात रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी मॅम, प्रिया गरुड मॅम, रूपाली शिंदे मॅम, एडना फर्नांडिस मॅम, मोनाली गायकवाड मॅम, सुषमा बावणे मॅम, रोहिणी पांडे मॅम, चैताली अहिरे मॅम तसेच मदतनीस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, मंगेश शिंदे, विनोद चौधरी, यांनी आतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम छान प्रकारे पार पडला.

Previous articleपिंगळवाडे परिसरात पावसामुळे राहत्या घरांची पडझड.
Next articleमहत्त्वाचे मंत्रिमंडळ बैठक निर्णय बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.