Home नाशिक पिंगळवाडे परिसरात पावसामुळे राहत्या घरांची पडझड.

पिंगळवाडे परिसरात पावसामुळे राहत्या घरांची पडझड.

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0012.jpg

पिंगळवाडे परिसरात पावसामुळे राहत्या घरांची पडझड.
संदीप गांगुर्डे प्रतिनिधी
पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क
साधारण आठ दिवसापासून होत असलेल्या संततदार पावसामुळे पिंगळवाडे व परिसरात चांगल्या घरांची पडझड होण्यास सुरुवात.
दिनांक ८ जुलैपासून महाराष्ट्रभर होत असलेला अवकाळी व सततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या पावसामुळे संतोष वाघ यांच्या घराची भिंत कोसळल्याने संसार उपयोगी साहित्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या नुकसानीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. विशेष बाब म्हणजे घराची भिंत दुपारच्या वेळेस पडल्याने घरात कोणीही नव्हते. यामुळे सुदैवाने कुठलाही अनर्थ झाला नाही तसेच गावातील इतरत्र घरांचे भिंत पडत असल्याने राहत्या घरांचे फार मोठे प्रमाणात नुकसान होत आहे या सततधार पावसामुळे पांधण रस्त्यांना जणू नदीचे स्वरूप आले आहे. पाण्याचा विसर्ग रस्त्याने होत असल्यामुळे पाई चालणे अवघड होत आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करून शाळेपर्यंत यावे लागत आहे. या पांधण रस्त्यांबाबत शासन दरबारी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.परंतु याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. नुकसान झालेल्या घरांची महसूल विभागाचे तलाठी सूर्यवंशी व ग्रामसेवक सुनील ठोके यांनी तात्काळ पंचनामा केला आहे. तरीसुद्धा शासन दरबारी पिडीतांना न्याय मिळावा व त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शासनाने वेळीच दखल घ्यावी जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत होईल. व घरकुल योजनेचा निधी जास्तीत जास्त स्वरूपात वाढविण्यात यावा.
सरपंच लताबाई केदा भामरे

Previous articleव-हाणेतील सट्टा अड्डयाला आशिर्वाद कुणाचा? पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष..!
Next articleनमन एज्युकेशन संचलित रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here