Home गुन्हेगारी व-हाणेतील सट्टा अड्डयाला आशिर्वाद कुणाचा? पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष..!

व-हाणेतील सट्टा अड्डयाला आशिर्वाद कुणाचा? पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष..!

87
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220714-095535_Google.jpg

व-हाणेतील सट्टा अड्डयाला आशिर्वाद कुणाचा? पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष..!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे गावात राजरोस सुरु असलेल्या सट्टा अड्डयाला नेमका आशिर्वाद कुणाचा?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मालेगांवच्या पंचशीलनगर भागातून व-हाणे येथे येऊन हा सट्टा मटक्यांचा जुगार चालविणारे सट्टा माफीया नेमके कोणाच्या आशिर्वादाने या गावात असे बेकायदेशीर धंदे करीत आहेत.त्यामुळे गोरगरिबांच्या टाळूवरील लोणी खाण्याबरोबरच आयाबहिणींच्या संसाराची राखरांगोळी मात्र होत आहे.त्याशिवाय या सट्टा माफीयाच्या या अवैध धंद्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी मजूर मिळणेही जिकीरीचे व अडचणीचे ठरत आहे.या अशा भयानक प्रकारची पोलिसांना गंधवार्ता असू नये म्हणजे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.या सट्टा माफीयांशी पोलिसांचेच काही अर्थपूर्ण हितसंबंध तर नाहीत ना?असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
“चोरी चोरी छुपके छुपके सट्टा माफीयांची खेळी;गोरगरीब पडतात बळी!”
व-हाणे येथील सट्टा अड्ड्याबाबत युवा मराठा आँनलाईन न्युजवर सडेतोड व परखडपणे वृत प्रसारीत करताच दिखावा दाखविण्यासाठी या गावातील सट्टा मटका अड्डा बंद झाल्याचे भासविण्यात आले.मात्र प्रत्यक्षात हा सट्टा अड्डा आजही प्रत्यक्षात चोरी चोरी छुपके छुपके बिनदिक्कतपणे सुरुच आहे.ज्या गावात दोन दोन महिने पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही त्या गावात मात्र सट्टा जुगाराच्या माध्यमातून माफीया चांगलाच हात धुवून घेत आहेत.याप्रश्नी पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेत हा अवैध धंदा बंद करावा,अन्यथा राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने आजच जिल्हा पोलिस प्रमुख डाँ.सचिन पाटील व विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांना निवेदन देण्यात येऊन कारवाईची मागणी केली जाणार आहे.

Previous articleसर्वत्र पावसाने जिल्ह्याच्या 34 प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यांवर
Next articleपिंगळवाडे परिसरात पावसामुळे राहत्या घरांची पडझड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here