Home जालना महारेशीम अभियान- 2024 तुती लागवडीकरीता नोंदणीस प्रारंभ

महारेशीम अभियान- 2024 तुती लागवडीकरीता नोंदणीस प्रारंभ

87
0

आशाताई बच्छाव

IMG_20231123_061404.jpg

महारेशीम अभियान- 2024 तुती लागवडीकरीता नोंदणीस प्रारंभ

प्रचार वाहनास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविला हिरवा झेंडा

शेतक-यांना मिळणार प्रति एकर रुपये 3.97 लाख रुपये अनुदान

नवीन तुती लागवडीकरीता नोंदणी करण्याचे आवाहन  

जालना,  (दिलीप बोंडे) – महारेशीम अभियान-2024 अंतर्गत नवीन तुती लागवड नोंदणी करण्यासाठी गावो-गावी जाणाऱ्या प्रचार वाहनास जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून महारेशीम अभियानाची जिल्ह्यात सुरूवात केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात २१ नोंव्हेबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी, (रो.ह.यो.) मनीषा दांडगे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक एस.आर. जगताप, क्षेत्र सहाय्यक व्ही.आर.कोल्हाळ, जी.के.गीते तसेच रेशीम उद्योजक गणेश शिंदे, वरूडी ता.बदनापुर, रेशीम उत्पादक शेतकरी भागवत येळेकर, आलमगाव राहुल काळे, लोणार भायगाव ता.अंबड आदींची उपस्थिती  होती. सदरचे महारेशीम  अभियान हे  २०  डिसेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की,  रेशीम उद्योग शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देत असुन जालना येथे रेशीम कोषाची मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे रेशीम शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी वाहतुक खर्च करून दुरवर जावे लागत नाही, तसेच मनरेगा अंतर्गत रेशीम विकास योजनेचया अनुदानात वाढ झाली असुन त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे अवाहनही त्यांनी केले.

तत्पुर्वी जिल्हास्तरीय महारेशीम अभियान बैठकीमध्ये    रेशीम विभाग, मनरेगा, पंचायत समिती व कृषी या सर्व विभागांनी मिळुन जिल्ह्यात किमान ३००० नवीन शेतकऱ्यांची तुती लागवडीकरीता निवड करावी अशी सुचना  जिल्हाधिकारी यांनी केली. बैठकीस मुख्य कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here