Home Breaking News चोपडा तालुक्यातील आदिवासी गावांचा ग्रामसेवका अभावी विकास खुंटतोय वरिष्ठ अधिकारी घेता आहेत...

चोपडा तालुक्यातील आदिवासी गावांचा ग्रामसेवका अभावी विकास खुंटतोय वरिष्ठ अधिकारी घेता आहेत झोपेच्या सोंग

406
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20231123-WA0078.jpg

चोपडा तालुक्यातील आदिवासी गावांचा ग्रामसेवका अभावी विकास खुंटतोय वरिष्ठ अधिकारी घेता आहेत झोपेच्या सोंग
१४ महिन्यातून ग्रामसेवकाची हजेरी फक्त दोनच
तालुका प्रतिनिधी  सुरेंद्र बाविस्कर
चोपडा-सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मोहरद, विष्नापूर, उमर टी हे आदिवासी गावे गेल्या चार-पाच वर्षापासून वासुदेव रामसिंग पारधी यांच्याकडे देण्यात आले आहेत तरी गेल्या चार-पाच वर्षात मोहरद गावात संबंधित ग्रामसेवक यांनी कोणत्याही २६ जानेवारी 15 ऑगस्ट किंवा एक मे आणि कोणत्याही महा मानवाच्या जयंती निमित्त गावात आज् पर्यंत हजेरी लावलेली नाही, त्या तीनही गावांना नेहमीच असे भासवत असतात की मी त्या अमुक गावात जाणार आहे, त्यांना सांगतात त्या गावात जाणार आहे, परंतु तिन्ही गावांपैकी कोणत्याही गावात हजेरी लावत नाही, गावातील सरपंच उपसरपंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, गावात सरपंच ग्राम पंचायत सदस्य यांना अनेक ग्रामस्थांच्या प्रश्नांच्या सामना करावा लागत आहे, तिघही गावांचे दप्तर हे ऑडिट चा बहाना सांगून सर्व बँकांचे पासबुक त्यांच्या घरीच ठेवायचे कोणतेही कागदपत्री जन्माची नोंद, रहिवासी दाखला, ग्रामसभा चा ठराव, इस्टिमेट, याकरिता गरीब लोकांना मोलमजुरी रोजंदारी सोडून चोपडा येथे चक्रा माराव्या लागत आहे, तरी संबंधित ग्रामसेवक वासुदेव पारधी हे चोपडा येथे जाऊन सुद्धा त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आणि कॉल स्वीकारला तर थोड्यावेळात तुमच्याशी बोलतो नंतर नंबर पाहून एरोप्लेन मोडवर टाकून देतात अनेक वेळा फोन लावला असता, तर ते नेहमी सांगतात मी धुळ्याला आलो आहे,बाहेर आहे थोड्याच वेळात बोलतो गट विकास अधिकारीआणि (कक्ष अधिकारी) ओ एस, यांच्या समोर जवळ जवळ पाच वेळा प्रत्यक्ष संबंधित ग्रामसेवक बद्दल तक्रार देऊन सुद्धा काहीच उपयोग होत नाही, संबंधित ग्रामसेवक हा वरिष्ठ अधिकारी यांचे सुद्धा फोन स्वीकारत नाही, जर संबंधित अधिकाऱ्यांचे जर हे ग्रामसेवक ऐकत नसेल तर सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी जायचे तरी कुणाकडे नेमका पाणी कुठं मुरत आहे हे एक आव्हानच आहे याला लोकशाहीची हत्याच म्हणावे लागेल, असे तालुक्यातील ग्रामस्थांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, चोपडा तालुक्यात भ्रष्टाचारा विषयी कायदा सुव्यवस्था आहे का? गेल्या नऊ दहा महिन्यात संबंधित ग्रामसेवकावर उमरटी येथील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराविषयी माहिती देऊन जवळ जवळ सत्तर लाखाच् भ्रष्टाचाराचा प्रकार मुलाखत देऊन पत्रकारांसमोर आणून न्यूज चैनल, तसेच पोर्टलवर अशा बऱ्याच दैनिकात बातम्या प्रसारित केल्या होत्या, पण त्यांच्या पदरी मात्र निराशाच एवढा मोठा भ्रष्टाचार करून त्यात कारवाई का करण्यात आली नाही, त्यानंतर पाठोपाठ विष्नापुर येथील संजय कोळी यांनी बँकेच्या पासबुक ची मागणी करीत असताना संबंधित ग्रामसेवक टाळाटाळ करत होते, त्यांना त्याचा भ्रष्टाचार विषयी संशय आल्याने पासबुकाच्या एन्ट्री मारली असता तिथे पण जवळजवळ २५ लाखाचे भ्रष्टाचार मानव विकास आणि पंधरावा वित्त आयोग आणि पेसा अंतर्गत मध्ये परस्पर डी एस सी चा दुरुपयोग करून सरपंच तसेच पेसा अध्यक्ष यांचा डी एस सी चा दुरुपयोग करून भ्रष्टाचार समोर आलेले आहे, संबंधित ग्रामसेवक यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये अशा एजन्सी आहेत की त्यांनी वरील तिन्ही गावा मध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे, त्यात त्याच एजन्सीचा समावेश आहे त्या एजन्सीची चौकशी केली असता कुठेही त्या नावाने शॉप किंवा दुकानच अस्तित्व दिसून येत नाही उदाहरणार्थ सत्यम एजन्सीज ,हरी ओम जनरल स्टोअर आणि काही त्याच्यासोबत दलाल यांच्या नावाने अकाउंट खोलून रक्कम काढली जाते असे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेब गट विकास अधिकारी साहेब, यांना देण्यात आले आहे, झालेला भ्रष्टाचाराबद्दल चौकशीची मागणी केली असता संबंधित ग्रामसेवक यांच्यावर गेल्या दहा अकरा महिन्यानंतर आज पर्यंत कोणतीच कारवाई का करण्यात आलेला नाही, शासन दरबारातून अनेक योजनांच पाऊस पडत असून संबंधित ग्रामसेवक, हा गावात न जाता कोणतीही मासिक सभा न घेता शासनाच्या विविध योजना परिपत्रक विषयी योजनां विषयी माहिती देण्यास टाळाटाळ करत असतो, बऱ्याच वेळा मुदतीच्या आत इस्टिमेट बनवून देत नाहीत, संबंधित सरपंच सदस्य पत्रकार यांनी बऱ्याच वेळा गट विकास अधिकारी यांच्या निदर्शनात आणूनदेऊन सुद्धा काही उपयोग होत नाही म्हणूनच योजना पासून आदिवासी गावांना वंचित राहावे लागत आहे, तसेच आज दिनांक 22/ 11/ 2023 रोजी सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी सेवक यांची विविध योजना विकास कामांसाठी मीटिंग घेण्यात आली होती, तेव्हा पण संबंधित ग्रामसेवक वासुदेव पारधी हजर नव्हतेच शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये बायोमेट्रिक मशीन द्वारे हजेरी लावण्यात यावी असा महाराष्ट्र शासन निर्णय जीआर काढण्यात आलेला आहे, आणि प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, मध्ये जनमाहिती अधिकारी यांच्या नावाने पाट्या लावण्यात याव्यात असा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी माहिती अधिकारी माहितीच्या अधिकाराचा व्यवस्थित उत्तर देत नाही, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन होत आहे, तरी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे, साहेब, माननीय फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब, आदिवासी मंत्री, साहेब जिल्हा अधिकारी साहेब, सी ओ साहेब जळगाव, यांनी चोपडा तालुक्यातील गावांतील तसेच आदिवासी बहुल भागात समिती नेमून संबंधित ग्रामसेवक किती महिन्यातून येतो किंवा नाही, याची चौकशी करून सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांचे दुःख जाणून चौकशी करण्यात यावी, असे स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार व संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन देण्यात येणार आहेत, चोपडा तालुक्यातील सरपंच सदस्य व ग्राम स्थ यांची मागणीला जोर धरून वेळ पडली तर तिन्ही गावांच्या विकासाच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनच्या वतीने संघटने मार्फत उपोषनाला बसणार आहेत, जय स्वराज्य

Previous articleमहारेशीम अभियान- 2024 तुती लागवडीकरीता नोंदणीस प्रारंभ
Next articleमंगल परिणय कार्यात भेट वस्तू ऐवजी वधूवरांना दिले भारतीय संविधान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here